Home मनोरंजन वर्ल्ड टेलिव्हिजन डे: लॉकडाउननंतर टीव्हीचं चक्र फिरलं... प्राइम टाइमपेक्षाही नॉन प्राइम टाइम...

वर्ल्ड टेलिव्हिजन डे: लॉकडाउननंतर टीव्हीचं चक्र फिरलं… प्राइम टाइमपेक्षाही नॉन प्राइम टाइम हिट – after lockdown non prime slot is more popular than prime slot on tv


मुंबई- इडियट बॉक्स म्हणून कितीही हिणवला गेला, तरी घरोघरी टीव्हीचं महत्त्व आजही कायम आहे. लॉकडाउनमध्ये घरी असताना बहुतांश प्रेक्षकांचा सर्वाधिक वेळ टीव्ही बघण्यातच गेला. ओटीटी (ओव्हर द टॉप) हे नवं माध्यम लवकरच टीव्हीला मागे टाकणार अशी कितीही चर्चा होत असल्या, तरी टीव्हीचं वेड कमी होताना दिसत नाहीय. एका अहवालातून असं दिसून आलं की, गेल्या एप्रिल महिन्यात टीव्ही पाहण्याचं प्रमाण अधिक होतं.

लॉकडाउन काळात टीव्हीची लोकप्रियता शिगेला पोहोचली. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’ यासारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचं फेरप्रक्षेपण झालं. त्यामुळे वाढीव प्रेक्षकांचा प्रतिसाद टीव्हीला मिळाला होता. सरासरी टीव्ही पाहण्याची जी कालमर्यादा होती, त्यातही प्रत्येक व्यक्तीमागे दोन टक्यांनी वाढ झाल्याचं अहवालात म्हटलंय.

मौलवीशी लग्न करणाऱ्या सना खानने सांगितलं नमाजसोबत आणखी काय करायला हवं

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील प्रेक्षकसंख्या आणि देशभरात लॉकडाउनचा निर्णय जाहीर झाल्यानंतरची प्रेक्षकसंख्या यांचा तुलनात्मक अभ्यास हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. विशेषत: २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत जास्त वाढ झाल्याचं हा अहवाल सांगतो. या काळात लहान मुलांच्या वाहिन्यांना वाढता प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यांची प्रेक्षकसंख्या ३३ टक्के इतकी होती. तर चित्रपट वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत १४ टक्के इतकी वाढ झाली होती.

कशी झाली सुरुवात?

१९९६ मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातल्या टीव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. यावेळी असा निष्कर्ष काढण्यात आला की, समाजात दिवसागणिक टीव्हीचं महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेम्बलीनं २१ नोव्हेंबर रोजी ‘वर्ल्ड टेलिव्हीजन डे’ घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी तो साजरा होतो.

कधी दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण, आज कोट्यवधींची मालकीण आहे भारती सिंग

नॉन प्राइम टाइम हिट

‘प्राइम टाइम’, अर्थात सर्वाधिक प्रेक्षकवर्ग मिळण्याचा कालावधी. टीव्हीच्या ‘प्राइम टाइम’चे तास म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत. याच वेळेत घरोघरी सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो. परंतु, सध्याच्या दिवसांत प्राइम टाइमचं चित्र बदललं आहे. लॉकडाउनचे दिवस आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर घरी टीव्ही सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे प्राइम टाइमच्या गणितात आमूलाग्र बदल झालाय. उलटपक्षी ‘नॉन प्राइम टाइम’च्या वेळेत टीव्ही पाहण्याचं प्रमाण वाढलंय.

त्यामुळे ‘नॉन प्राइम टाइम’ हा ‘प्राइम टाइम’पेक्षा हिट ठरतोय. हिंदी जीइसी, अर्थात जनरल एंटरटेन्मेंट चॅनल्स ‘प्री कोविड’ दिवसांच्या तुलनेनं सध्याच्या दिवसांमध्ये नॉन प्राइम टाइम वेळेत अधिक पाहिली गेली आहेत. म्हणजेच पूर्ण दिवसाच्या व्ह्यूअरशिपमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॉन प्राइम टाइमवेळेत तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली असून दुसरीकडे प्राइम टाइम वेळत व्ह्यूअरशिपमध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे.

धर्मासाठी सिनेसृष्टी सोडल्यानंतर सना खानने केला मौलाना मुफ्ती अनसशी निगाह

प्रमुख प्रेक्षक महिला

मालिकांचा सर्वाधिक प्रेक्षक हा महिलावर्ग आहे असं आजवर अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या महिलावर्गातही गृहिणी आणि नोकरदार महिला अशी वर्गवारी कालांतरानं होत गेली. पूर्वी गृहिणींचं प्रमाण प्रेक्षकांमध्ये जास्त होतं. पण, आता नोकरदार महिलाही यात येऊ लागल्या. विविध वाहिन्यांची अॅप्स उपलब्ध झाल्यामुळे प्रवासाच्या वेळेत त्या दैनंदिन मालिका बघू लागल्या. हे लक्षात घेऊनच आजवर प्रसारित झालेल्या मालिकांमध्ये जवळपास ९० टक्के मालिका स्त्रीकेंद्री असतात, असं तज्ज्ञ सांगतात. मालिकेची नायिका सोशिक, साधी, समाधानी दाखवली जाते. पण कथानकानुसार स्वाभिमानी, कणखर दाखवणंही गरजेचं होऊ लागलं आहे.

प्रेक्षकांची सरासरी टीव्ही पाहण्याची वेळ

लॉकडाउनपूर्वी : ३ तास ४६ मिनिटं

लॉकडाउनदरम्यान : ४ तास ४८ मिनिटं

सध्या लॉकडाउननंतर : ४ तास ९ मिनिटं

एका आठवड्यात एक प्रेक्षक सरासरी किती वाहिन्या पाहतो‌?

लॉकडाउनपूर्वी : १६ वाहिन्या

लॉकडाउन दरम्यान : २३ वाहिन्या

सध्या लॉकडाउननंतर : १८ वाहिन्या

मराठीतील माइलस्टोन मालिका

फार पूर्वी तेरा भागांच्या मालिका बनत असत. मात्र दैनंदिन मालिका सुरू झाल्यानंतर अशा अनेक मालिका आल्या, ज्यांची नावं प्रेक्षकांच्या स्मृतीपटलावर कोरली गेली आहेत. त्यांची शीर्षकगीतं लोकांच्या ओठांवर आहेत. अशाच माइलस्टोन ठरलेल्या मराठी मालिका.

दामिनी, आभाळमाया, गोट्या, वादळवाट, प्रपंच, असंभव, अवंतिका, श्रीयुत गंगाधर टिपरे, चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, पुढचं पाऊल, अग्निहोत्रSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Recent Comments