Home शहरं नागपूर वाघांच्या संचारमार्गात ‘बांदरा’ची बाधा

वाघांच्या संचारमार्गात ‘बांदरा’ची बाधा


पंकज मोहरीर, चंद्रपूर

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनपासून अवघ्या सात किमी अंतरावरील बांदर कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या खाणीमुळे ताडोबा-घोडाझरी मार्गाने उमरेड-कऱ्हाडला, नवेगाव-नागझिरा, पेंचमध्ये भ्रमण करणाऱ्या वाघांची वाट प्रभावित होणार आहे. वाघांना सहजतेने उपलब्ध हा असणारा हा संचारमार्ग बंद झाल्यास ताडोब्यातील वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका सूत्रांनी वर्तविला आहे.

ताडोब्याचे जंगल ‘रॉयल बेंगॉल टायगर’ या वाघांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक ११५ वाघ या प्रकल्पात असल्याचा अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे. या प्रकल्पातील वाघांचा घोडाझरीपर्यंत मुख्य मार्ग आहे. त्यानंतर हे वाघ उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, नवेगाव-नागझिरा व्याघप्रकल्प, पेंच व्याघ्रप्रकल्प किंवा बोर, मेळघाट व्याघ्रप्रकल्पात जात असतात. पण, ही खाण अस्तित्वात असल्यास वाघांसाठी सहज उपलब्ध असणारा मार्ग बंद होणार आहे.

ताडोब्याच्या दक्षिणेकडे खुल्या कोळसा खाणी तर पूर्व व पश्चिमेकडे गावे आहेत. त्यामुळे वाघांना या भागातून जाता येत नाही. घोडाझरीपर्यंतचा मुख्य मार्ग बंद झाल्यास हे सर्व वाघ गावाच्या दिशेने गेल्यास मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढीस लागणार आहे. केवळ उत्तरेकडील मार्ग सुरक्षित असला तरी तो अरुंद आहे. त्यातच हुमण हा सिंचन प्रकल्प व आता बांदर कोल ब्लॉक येत असल्याने मोठे संकट उभे ठाकण्याची भीती पर्यावरण अभ्यासक किशोर रिठे यांनी व्यक्त केली. ‘गंभीर धोके बघता या बांदर कोल ब्लॉकला रद्द करण्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. तेव्हा तो रद्दही करण्यात आला होता. पण, नव्याने त्याला परवानगी देणे घातक आहे,’ असे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी सांगितले.

वाघांना जाण्यासाठी दक्षिण-पूर्व मार्ग थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे दुसरे धोके आहेत. वाघाला स्थलांतरित व्हायला ती जागा उत्तम नसल्याने वाघांचे भ्रमणमार्ग उत्तम ठेवणे गरजेचे आहे. – गिरीश वशिष्ठ, माजी वनाधिकारी

नऊ वर्षांपूर्वीही विरोध

व्यवस्थापनाने अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना १७ ऑगस्ट २०११ रोजी लिहिलेल्या पत्रातून जैविक विविधता व उत्तम अधिवास असणाऱ्या या व्याघ्रप्रकल्पात प्रस्तावित बांदर कोळसा ब्लॉकला परवानगी देऊ नये, असे स्पष्टपणे सूचविले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा व मध्य भारताचा महत्वाचा कॉरिडॉर असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.

म्हणून कॉरिडॉर महत्वाचा

देशात ताडोबा हे एक सर्वात उत्तम प्रजनन केंद्रांपैकी एक म्हणजे वाघांचे ‘मॅटिर्निटी होम’ आहे. येथे जन्माला आलेला वाघ मोठा झाल्यावर आपला अधिवास शोधासाठी बाहेर पडतो. या वाघांसाठी ताडोबा व घोडाझरी अभयारण्य हे महत्वाचे क्षेत्र आहे. बांदर कोळसा खाणीमुळे ताडोबा-घोडाझरी हा मुख्य मार्गच प्रभावित होणार आहे. हा धोका वेळीच लक्षात घेतला जावा, असा मुद्दाही वन्यजीवतज्ज्ञांनी मांडला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jagannath kunte: jagannath kunte : नर्मदे SS हर हर… लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन – narmade har har writer jagannath kunte passed away

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आपल्या लिखाणातून नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि 'नर्मदे हर हर' या पुस्तकासाठी ( narmade har har ) अफाट लोकप्रियता...

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments