Home शहरं पुणे वाचनाचे दिवस..

वाचनाचे दिवस..Sujit.Tambade@timesgroup.com

@sujittambadeMT

पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, आजवर एक चित्र पुण्यात दर वर्षी पहायला मिळायचे. उन्हाची तिरीप वाढण्यापूर्वी नाहीतर उन्हे मावळतीला जाऊ लागल्यावर अस्सल पुणेकरांची पावले आपसूक वळायची, ती ग्रंथालयांकडे! वाचनाची भूक भागविण्यासाठी मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच सर्वांची हजेरी वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये असायची. ग्रंथालयातील आपली जागा पकडून तासन‌्तास पुस्तकांमध्ये डोके खुपसून बसणारी माणसे कमी होत असल्याची ओरड होत असली, तरी पुण्यात या काळात ग्रंथालये बोलकी होतात; पण सध्या लॉकडाउनने ग्रंथालयांना कुलुपे लागली असताना, त्यांची जागा घेतलीय ई-बुक आणि पीडीएफ रूपातील पुस्तकांनी. सोशल मीडियावरून येणारी ही पुस्तके वाचून वाचनभक्त वाचनाची भूक भागवताहेत!

‘हल्ली की नाही पुस्तके कोणी वाचतच नाहीत’ असले निराशाजनक वाक्य सतत कानावर पडत असते; पण लॉकडाउनने हे साफ खोटे ठरवले आहे. लॉकडाउनच्या निमित्ताने का होईना वाचन चळवळीला पुन्हा बहर येऊ लागला आहे. पुस्तकांच्या पीडीएफ शोधून त्या स्वत: वाचन करण्याबरोबरच सोशल मीडियावरून दुसऱ्यांना पाठविण्यात वाचनभक्त आनंद घेताहेत, हे चित्र लॉकडाउनच्या काळात पाहायला मिळू लागले आहे.

पुण्यात पुस्तकांचा खजिना असलेली अनेक ग्रंथालये आहेत. प्रत्येकाची एक खासियत आहे. वाचकांच्या अभिरूचीप्रमाणे ही ग्रंथालये पुस्तकसेवा देत आली आहेत. त्यामध्ये काही मोजकी नावे सांगायची, तर भांडारकर इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय, डेक्कन कॉलेजचे ग्रंथालय, इतिहास संशोधन मंडळाचे ग्रंथालय ही ग्रंथालये संशोधनवृत्ती असलेल्या वाचकांसाठी जवळची वाटतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय हे कॉलेजकुमारांचे खास ठिकाण. मात्र, कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र आदी वाङ्मयप्रकारातील पुस्तके घेऊन निखळ आनंद देणारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांनी पुणेकरांच्या मनात मानाचे स्थान मिळविले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र्र साहित्य परिषदेचे ग्रंथालय, पुणे मराठी ग्रंथालय, पुणे नगर वाचन मंदिराचे ग्रंथालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय, सिद्धार्थ लायबरी आदींचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय खासगी वाचनालयेही मोठ्या प्रमाणात सेवा देत आली आहेत. इंग्रजी पुस्तकांच्या वाचनासाठी ब्रिटिश लायब्ररी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या ग्रंथालयांमध्ये बसायला जागा मिळत नाही …हे चित्र लॉकडाउनमुळे दिसेनासे झाले आहे. त्याऐवजी आता घरी बसून वाचनप्रेमी हे पुस्तकवाचनाचा आनंद घेत आहेत.

लॉकडाउनच्या काळात ई-बुक आणि पीडीएफ स्वरूपातील पुस्तके उपलब्ध करून वाचनाचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावरून ही पुस्तके एकमेकांना देत पुस्तकांचा हा खजिना सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे. आजवर वाचनालयांच्या कपाटांमध्ये धूळ खात पडलेली; पण लोकांपर्यंत पोहोचू न शकलेली अनेक जुनी पुस्तके ही लॉकडाउनच्या निमित्ताने वाचकांच्या हातात पडू लागली आहेत. पुणेकर ही पुस्तके वाचण्यात रंगले आहेत.

इंटरनेटद्वारे अनेक जुन्या पुस्तकांचा मोफत खजिना उपलब्ध होत आहे. त्यापैकी काही पुस्तके आज बाजारात कोठेही मिळत नाहीत. अशी पुस्तके ही पीएडीएफ स्वरूपात आहेत. अनेक जण ती डाउनलोड करून वाचत आहेत. महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वेबसाइटवर सुमारे ४०० पुस्तके पीडीएफ रूपात वाचनांसाठी खुली आहेत. https://sahitya.marathi.gov.in/ या वेबसाइटवर ही पुस्तके आहेत. यातले एक-एक पुस्तक वाचून होईपर्यंत लॉकडाउनचे संकट दूर झालेले असेल. एक मात्र खरे की, या लॉकडाऊनने घरात अनेक दिवसांपासून कपाटात ठेवलेल्या पुस्तकांची धूळ झाडली जात आहे आणि ती पुस्तके वाचून पर्यायाने कामाच्या व्यापात साचलेली प्रत्येकाच्या मनावरील मळगळही दूर होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sunil Gavaskar: IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान – ind vs eng : indian former...

अहमदाबाद, IND vs ENG : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि...

Kareena Kapoor Khan New Photos From Home Saif Ali Khan – स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो | Maharashtra...

हायलाइट्स:हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूरदुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक२१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्ममुंबई-करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा...

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

Recent Comments