संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेल्या महिन्यामध्येही काही भारतीयांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय राजदूत पवन कपूर यांनी २० एप्रिल रोजी जाहीर निवेदन करत, कोणत्याही धर्माविरोधात पोस्ट न टाकण्याचे आवाहन तेथील भारतीय नागरिकांना आवाहन केले होते. त्यानंतरही याप्रकारचे संदेश येत असल्याचेच समोर आले आहे.
एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या रोहीत रावतला त्याच्या कंपनीने निलंबित केले असून, त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे, तर शारजामधील न्युमिक्स ऑटोमेशन या कंपनीने स्टोअरकिपर सचिन किन्नीगोलीला निलंबित केले आहे. कंपनीने त्याचे वेतनही रोखून धरण्यात आले आहे. एखादी व्यक्ती अन्य कोणाच्या धर्माचा अवमान करत असल्याचे दिसून आले, तर त्याने योग्य त्या कारवाईलाही सामोरे जाण्यास तयार राहावे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.
आणखी वाचा: