Home मनोरंजन विकी कौशल : विकी कौशलच्या सोसायटीतील 'लिटिल वॉरिअर' ने हरवलं करोनाला -...

विकी कौशल : विकी कौशलच्या सोसायटीतील ‘लिटिल वॉरिअर’ ने हरवलं करोनाला – vicky kaushal shares a video of girl from his society returns home after fighting covid 19 video viral


मुंबई- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लॉकडाउनमधल्या अनेक गोष्टी शेअर करत असतो. घरात जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी तो काय करतो याबद्दलही तो चाहत्यांना सातत्याने सांगत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल यात काही शंका नाही.

महाभारत: सीनमध्ये तुम्हाला दिसला का ‘कुलर’

इन्स्टाग्रावर शेअर केला व्हिडिओ-

विकीने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला त्यात त्याच्या इमारतीतील ११ वर्षांच्या मुलीली जिला करोना झाला होता ती बरी होऊन घरी परतली. इमारतीत येताच लोकांनी तिचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘नैराश्याच्या दिवसांत आशेचा किरण. आमचा छोटा लढवय्या परत आला.’

तर २१ वर्षांपूर्वीच झालं असतं सलमानचं लग्न

विकी कौशलने केली १ कोटींची मदत-

करोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. यात विकी कौशलनेही १ कोटी रुपयांची मदत केली. त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपये दिले.

विकी कौशलचे आगामी सिनेमे-

विकीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा ‘भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर तो ‘सरदार उधम सिंग’ आणि ‘तख्त’ या सिनेमांमध्ये दिसेल. ‘सरदार उधम सिंग’ पुढच्या वर्षी १५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर मल्टीस्टारर ‘तख्त’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नाही.

ऐश्वर्या-बिग बींच्या नात्याबद्दल बोलल्या जया

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा’ – caste based obc census should be conducted

म. टा. वृत्तसेवा, कळवणमराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात...

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Recent Comments