Home ताज्या बातम्या विठुरायाच्या पंढरीत कोरोनाचा धोका, एकादशीला विविध जिल्ह्यांतून 16 भक्त विनापरवाना आले, coronavirus...

विठुरायाच्या पंढरीत कोरोनाचा धोका, एकादशीला विविध जिल्ह्यांतून 16 भक्त विनापरवाना आले, coronavirus 16 people from different districts entered Pandharpur without permission mhas | News


या सर्व 16 विठ्ठलभक्तांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

पंढरपूर, 2 जून : एकादशीनिमित्त पंढरपूर येथे परजिल्ह्यातील विनापरवाना तब्बल 16 लोक फिरताना आढळून आले आहेत. या सर्व 16 विठ्ठलभक्तांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

मंगळवार हा एकादशीचा दिवस आहे. त्यामुळे दर महिन्याची एकादशीला वारी करणारे अनेक विठ्ठल भक्त महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात फारसे वारकरी तथा विठूभक्त पंढरीत आले नाहीत. मात्र लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्यावर आज तब्बल 16 विनापरवाना विठ्ठलभक्त पंढरीत वावरताना दिसून आले.

या सर्व विठ्ठल भक्तांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांची सध्या वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून होत आहे. पंढरपुरात सापडलेल्या 16 विठ्ठलभक्त हे नांदेड , सातारा , सांगली , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा – पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरला कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. असं असताना विविध जिल्ह्यातील लोक तालुक्यात दाखल होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पुढील काही दिवस विठुरायाच्या भक्तांनीही काळजी घ्यावी, असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Jun 2, 2020 10:17 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Recent Comments