Home शहरं मुंबई विद्यानगरीमध्ये चित्रनगरी अवतरणार?

विद्यानगरीमध्ये चित्रनगरी अवतरणार?



सांताक्रूझ : लाइट…कॅमेरा…अॅक्शन…ही चित्रपट नगरीतील वाक्ये लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात ऐकावयास मिळण्याची शक्यता आहे. एका बड्या चित्रपट निर्माता कंपनीने याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असून, याबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत होकारात्मक निर्णय झाल्यास विद्यानगरीतच ” अवतरणार आहे.

चित्रपट आणि कॉलेज यांचे फार जवळचे नाते आहे. मुंबईतील अनेक नामांकित नवी-जुनी कॉलेजे चित्रपटांमधून लोकांसमोर आली. आता लवकरच मुंबई विद्यापीठाचे कालिना संकुलही चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. देशातील अनेक नामांकित कॉलेजांमध्ये हिंदी, मराठीसह इतर अनेक भाषांतील चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. यामुळे तरुणांमध्ये या शिक्षणसंस्थांबद्दल आकर्षणही निर्माण झाले आहे. मुंबईतील काही नामांकित कॉलेजांमध्ये चित्रीकरण झाल्यानंतर आता एका बड्या चित्रपट निर्मात्याने मुंबई विद्यापीठातील कालिना संकुलातील आंबेडकर भवन समोरील मैदानाची चित्रीकरणासाठी निवड केली आहे. हे मैदान या कंपनीला तब्बल ७५ दिवसांसाठी हवे आहे. यात काही तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकामही केले जाणार आहे. ही सर्व जबाबदारीही निर्माता घेणार असल्याचे विद्यापीठाला पाठवलेल्या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यासाठी दरदिवशी विद्यापीठाला भाडेही मिळणार आहे. इतक्या मोठ्या चित्रीकरणाची विद्यापीठातील ही पहिलीच वेळ असणार आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये काही सदस्यांनी विद्यापीठाने चित्रीकरणासाठी अशा प्रकारे जागा दिल्यास त्याचा फायदा विद्यापीठाच्या प्रचार आणि प्रसारासाठी होऊ शकतो. जगासमोर हे कॅम्पस पोहचू शकते, असे मत मांडले. तर काहींनी इतके दिवस ही जागा चित्रीकरणासाठी देणे गैर असल्याचे नमूद केले. या सगळ्यात विद्यापीठाला मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन होणार आहे. यामुळे विद्यापीठाने हा प्रस्ताव स्वीकारावा, असेही काही सदस्यांनी सूचित केले.

‘नॅक’ची अडचण

तब्बल अडीच वर्षांनी विद्यापीठाने नॅक मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. येत्या दोन महिन्यांत ‘नॅक’ची समिती विद्यापीठात भेट देण्यासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे ती समिती आल्यावर जर तेथे शुटिंग सुरू असेल तर त्याचा मूल्यांकनावर काही परिणाम होऊ शकतो का, असा प्रश्नही काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर त्याची अडचण ‘नॅक’ समितीला नसावी, असे मतही बैठकीत उमटल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर्तास विद्यापीठाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे बैठकीत ठरल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत सरकारशी सल्लामसलत करण्याचा विचारही काही सदस्यांनी बोलून दाखवला. यामुळे विद्यापीठ चित्रपटात दिसणार की नाही हे लवकरच आपल्याला कळणार आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Prakash Javadekar: जावडेकरांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिथावले’ – rahul gandhi wasn’t only supporting protest but also instigating says union min...

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या हिंसाचाराचा ( tractor rally violence ) ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटला भाजपने शेतकरी...

Recent Comments