Home शहरं पुणे विद्यार्थ्यांचा गावीजाण्याचा मार्ग मोकळा

विद्यार्थ्यांचा गावीजाण्याचा मार्ग मोकळापुणे : पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी आता पुणे जिल्हा प्रशासनाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडे नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत खासगी बसने त्यांच्या जिल्ह्यात पाठवले जाणार आहे. यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे सहकार्य घेतले जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार नाही.

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने, विद्यार्थी हवालदिल झाले होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी वृत्तांद्वारे पाठपुरावा केला होता. जिल्हा प्रशासनाकडून हे विद्यार्थी घरी पाठविले जावेत, यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे, किरण निंभोरे ; तसेच एमपीएससी समन्वय समितीच्या राहुल कवठेकर यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नैसर्गिक आपत्ती निधीतून या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण ९०० विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ९१५८२७८४८४, ८४८४०८६०६१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महेश बडे यांनी केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

Recent Comments