Home शहरं नाशिक वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी स्टाफविरुद्ध गुन्हा

वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी स्टाफविरुद्ध गुन्हाम. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव येथे वृद्धेचा मृतदेह आढळल्यानंतर कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. हे प्रकरण तापल्यानंतर रात्री उशिरा वॉर्ड क्रमांक सातमधील संबंधित डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, वार्डबॉय आणि वार्ड लेडी यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोविड रुग्णालयातील विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळसकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. वृद्धेवर उपचार सुरू असताना वॉर्ड क्रमांक सातमधील डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय आणि वार्डलेडी यांनी उपचाराकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणा केल्यानेच वृद्धेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल तपास करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

upsc capf interview: यूपीएससी सीएपीएफ भरती: मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर – upsc capf 2019-20 interview dates are released by upsc

UPSC CAPF 2019-20 interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत....

anil deshmukh: म्हणून CBIबाबत ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण – maharashtra government has revoked its order of the ‘general consent’ given to...

मुंबईः 'सीबीआय ही प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्याचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळंच सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय...

Recent Comments