Home संपादकीय वेगवान मान्सून

वेगवान मान्सून


जूनच्या पहिल्या तारखेला केरळ किनारपट्टीवर थडकलेल्या मान्सूनने वेगाने आगेकूच करीत २६ दिवसांत अवघा देश व्यापला. साधारणपणे आठ जुलैला तो पश्चिम राजस्थानात प्रवेश करून देश व्यापतो. यंदा त्याने बारा दिवस आधीच ही कामगिरी केल्याने चांगल्या पावसाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवून हवामान खात्याने यापूर्वीच आशा पल्लवित केल्या आहेत.

जूनमधील पाऊस पाहता हा अंदाज अगदीच चुकणार नाही. जूनच्या पहिल्या २५ दिवसांत देशभरात १५५.१ मिलिमीटर आणि राज्यात २१३.३ मिमी पाऊस झाला. तो दोन्ही सरासरींपेक्षा (अनुक्रमे १२८.३ मिमी आणि १६७.५ मिमी) जास्त आहे. पहिल्या काही दिवसांतील दमदार सरींनंतर पाऊस गायब होण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा घडला आहे. यंदा उर्वरित महिन्यांतही असाच पाऊस होईल, असा निष्कर्ष काढता येणार नाही; परंतु जुलै आणि ऑगस्ट हे महिने भरपूर पावसाचे असतात.

गेल्या काही वर्षांत तर या दोन महिन्यांतच सर्वाधिक पाऊस झाल्याची उदाहरणे आहेत. शिवाय, पावसाशी संबंधित सर्व हवामानशास्त्रीय घटकांचा योग्य मागोवा घेऊन संख्याशास्त्रीय प्रारूपांद्वारे अंदाज वर्तविण्याचे शास्त्रही आपल्याकडे चांगले विकसित होत आहे. त्यामुळे यंदाही अंदाज बरोबर येईल, अशी आशा आहे. करोनाचा संसर्ग कमी होत नसला, तरी त्याच्यासह जगण्याच्या नवसाधारण स्थितीला सामोरे जात अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक गतिमान करण्याचा प्रयत्न होत असताना मान्सूनने साथ देणे आवश्यक आहे; कारण आपली अर्थव्यवस्था अजूनही पावसावर अवलंबून आहे.

पाऊस चांगला झाला, तर बाजारात पैसा अधिक वेगाने फिरू लागतो. म्हणूनच मान्सूनने बारा दिवस आधीच देश व्यापण्याची घटना दिलासादायक आहे. करोनाग्रस्त काळात हा दिलासा महत्त्वाचा. गेल्या दोन वर्षांत देशाच्या आणि राज्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊन पुराच्या घटना घडल्या. नद्या आणि नाल्यांमध्ये केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढला आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यंदा त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी मात्र घ्यायला हवी.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments