Home शहरं पुणे व्यापाऱ्यांचा स्थलांतरास नकार

व्यापाऱ्यांचा स्थलांतरास नकारम. टा. प्रतिनिधी,

मार्केट यार्डातील भुसार विभागाचे करण्याची सर्वच व्यापाऱ्यांची मागणी नाही. बदलत्या काळानुसार व्यापार वाढण्यासाठी स्थलांतर हा पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मार्केट यार्डातील काही व्यापाऱ्यांनी केली.

त्या वेळीच अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्यास जागेत मालाची साठवणूक करणे शक्य होऊन पॅकिंग, वेअर हाउस, कोल्डस्टोरेज यांसारख्या सोयीसुविधा उभारणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरचे संचालक राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार; तसेच ईश्वर नहार आणि दिलीप मेहता यांनी पत्रकार परिषदेत जागेच्या स्थलांतराबाबत भूमिका जाहीर केली.

एक देश, एक कराच्या अंमलबजावणीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना सेस आणि व्यवसाय कर भरावा लागतो. बाजाराबाहेर व्यवसाय करणाऱ्यांना सर्व करांतून मुक्ती देण्यात आली आहे. यामुळे मार्केट यार्डातील दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे. व्यापार वाढण्याच्या दृष्टीने बाजार समिती कायद्यात सकारात्मक बदल करण्यात यावेत; तसेच मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सर्व बंधनातून मुक्त करावे अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक राजेंद्र बाठिया यांनी केली. रायकुमार नहार म्हणाले, ‘केंद्र सरकारने बाजार समिती आवाराबाहेरील शेतमालाच्या व्यापार पद्धती व नियम बाजार आवारातील व्यापारासाठी लागू करावेत.’

केंद्र सरकारने कृषी व्यापार नियमनाबाबत नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना बंधनमुक्त करण्यात आले आहे; तसेच ज्यांच्याकडे आयकर विभागाची नोंदणी आहे. त्यांना कोणत्याही भागात, राज्यात कोणत्याही भागात व्यापार करण्याची मुभा देण्यात आली आहे. बाजार समित्यांना अशा व्यवहारांना कोणताही नोंदणी परवाना अथवा कृषी व्यवसायाबद्दलचे अधिभार स्थगित होणार आहेत. बाजार समितीला कोणाशीही स्पर्धा करावी लागेल. मात्र, परंपरागत व्यापार; तसेच व्यवहारावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

– राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चं‌‌ट्स चेंबर

भूखंडांना दोन एफएसआय द्या

बाजार आवारातील भूखंडासाठी दोन एफएसआय दिल्यास ऑनलाइन व थेट डिलिव्हरी व्यापाऱासाठी छोट्या पॅकिंगमधील वस्तूंची व्यापार वाढविणे तसेच साठवणूक शक्य होईल. आवारातील व्यापार सर्व बंधनातून मुक्त केल्यास व्यवसाय वाढून नवीन कायद्यानुसार स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments