Home देश शहीद जवानांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट: गलवान हिंसाचार : शहिदांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक सत्य...

शहीद जवानांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट: गलवान हिंसाचार : शहिदांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक सत्य समोर – india china galwan clash : brutal injury marks on bodies of soldiers, postmortem report


श्रीनगर :गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना २० भारतीय जवान शहीद झाले. या सैनिकांवर चीनी सैन्याकडून खिळे लावलेल्या रॉडने आणि लोखंडी सळ्यांनी क्रूर हल्ला करण्यात आला होता. आता या जवानांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मध्ये धक्कादायक आणि तेवढ्याच क्रूर गोष्टी समोर आल्यात. या जवानांच्या शरीरावर खोल जखमा आढळल्यात आहेत. लेहच्या एसएनएम रुग्णालयात जवानांच्या मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं.

पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, काही जवानांच्या शरीराचं तपमान कमी झाल्यानं (हायपोथर्मिया) त्यांचा मृत्यू झाला. तर काहींचा मृत्यू श्वास कोंडल्यानं झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या जवानांच्या शरीरावर खोलवर जखमा होत्या, त्यावरून या हल्ल्याची क्रूरता लक्षात येत होती.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘इकोनॉमिक टाईम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १७ जवानांच्या शरीरावर जखमांचे निशाण आहेत. अधिकारी रुग्णालयात उपस्थित आहेत आणि सेना बेसला जवानांच्या मृतदेहांचे फोटो न काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा :india-china clash: राजनाथ सिंह मॉस्कोला जाणार; चीनी नेत्यांना भेटणार नाही
वाचा :अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही : जामयांग नामग्याल

याअगोदर, सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासहीत तीन जवानांच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळले नव्हते परंतु त्यांच्या डोक्यावर हत्यारानं हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या होत्या.

आणखीन एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन जवानांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यानं झालाय. परंतु, इतर जवानांच्या शरीरावर हत्यारांनी मारहाण झाल्याच्या खुणा आहेत. तीन जवानांच्या चेहऱ्यांवर इतक्या जखमा होत्या की ते नीट ओळखूही येत नव्हते. तर आणखी तीन जणांच्या गळ्यावर कापल्याचे निशाण आढळलेत. अनेकांच्या शरीरावर नखांचेही निशाण आहे. चीनी सैनिकांकडे चाकूही होता.

काही जवान उंचावरून खाली नदीत पडल्याचं आढळलं. १४ हजार फुटांच्या उंचीवर गलवान खोऱ्यातील गोठवणाऱ्या थंडीत आणि दुर्गम क्षेत्रात मदत न मिळाल्यानंही काही जवानांचा मृत्यू झाला. १२ जवानांचा मृ्त्यू हायपोथर्मियामुळे आणि श्वास गुदमरल्यानं झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळतेय.

भारत चीन सीमेवर जवळपास ४५ वर्षानंतर एखाद्या सैनिकाला हौतात्म्य पत्करावं लागलंय. याअगोदर, १९७५ मध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या हल्ल्यात भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. तेव्हा अरुणाचल प्रदेशात चीननं भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता यात चार सैनिक हुतात्मा झाले होते.

वाचा :Ladakh Clash: एकही भारतीय सैनिक बेपत्ता नाही, लष्कराकडून स्पष्टीकरण
वाचा :LAC stand-Off: चीनच्या ताब्यात होते १० भारतीय जवान; चर्चेनंतर सोडले
वाचा :‘मेरा सुनील अमर रहे’, हुतात्म्याला पत्नी-मुलानं दिला अंतिम निरोप
वाचा :लॉकडाउन संपल्यावर मी घरी येईन… शहीद जवान दीपककुमारने दिला होता शब्दSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments