Home मनोरंजन शाहरुख खान: दोन मराठी लेखकांनी शाहरुख खानवर केला कथा चोरल्याचा आरोप -...

शाहरुख खान: दोन मराठी लेखकांनी शाहरुख खानवर केला कथा चोरल्याचा आरोप – two marathi writers plagiarism charges on shah rukh khans netflix series betaal


मुंबई- शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘बेताल’ वेब सीरिजचा ट्रोलर आठवड्याभरापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता. शाहरुखच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्टने या सीरिजची निर्मिती केली. पण आता हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मराठी लेखक समीर वाडेकर आणि मेहश गोसावी यांनी बेताल सीरिजची कथा चोरल्याचा आरोप शाहरुखवर केला आहे. त्यांच्या ‘वेताळ’ सिनेमातून कथा चोरल्याचा आरोप त्यांनी केला.

आयसीयूमध्ये अभिनेता, म्हणाला- आता फक्त सलमान खानकडूनच मदतीची अपेक्षा

दोन्ही लेखकांच्या मते त्यांनी त्यांचं स्क्रिप्ट स्क्रीन रयटर्स असोसिएशनमध्ये याआधीच रजिस्टर केलं आहे आणि कथा चोरल्याची तक्रारही असोसिएशनकडे केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना लेखक म्हणाले की, ‘वर्षभरापूर्वीच त्यांनी स्क्रीप्ट रजिस्टर केली होती आणि त्याच्या काही महिन्यांनंतर जुलै २०१९ मध्ये ‘बेताल’ सीरिजचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाची कथा घेऊन तेअनेक निर्मात्यांकडे गेले होते. यात रेड चिलीज एण्टरटेनमेन्टसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. सध्या उच्च न्यायालयात हा वाद गेला आहे.’

दिग्दर्शकाच्या मावशीचा करोनाने मृत्यू, सांगितलं भयानक वास्तव

लेखकांच्या मते, कथा आणि संकल्पनेसोबतच स्क्रिप्टमधील अनेक सीन चोरी केले आहेत. वाडेकर आणि गोसावी यांनी सीरिजवर स्थगिती आणण्याची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायलयाने ही याचिका फेटाळली. पण जर त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर नंतर ते भरपाईची मागणी करू शकतात. दरम्यान, शाहरूख खानच्या कंपनीकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments