Home शहरं पुणे शिक्षक भरती: शिक्षक भरतीच्या अमिषाने फसवणूक, १४ लाखांना गंडवले - fraud in...

शिक्षक भरती: शिक्षक भरतीच्या अमिषाने फसवणूक, १४ लाखांना गंडवले – fraud in teacher recruitment in baramati two people arrested


म. टा. वृत्तसेवा, बारामती

शिक्षक भरतीपोटी १४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन तानाजी जाधव (रा. कल्पनानगर, बारामती) आणि गणेश कमलाकर गोडसे उर्फ काका (रा. विद्यानगर, कऱ्हाड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दिलीप जगन्नाथ किर्तने (वय ६५, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा अक्षय याचे एटीडी जीडीएआरटी आणि सून नीलम यांचे ‘डीएड’चे शिक्षण झाले आहे. जून २०१४ मध्ये गणेश गोडसे फिर्यादीच्या घरी गेला होता. या वेळी चर्चेमध्ये नोकरीचा विषय निघाला असता गोडसेने मुलगा आणि सुनेला नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले. ‘एका व्यक्तीसाठी सात लाख याप्रमाणे दोघांचे १४ लाख रुपये द्यावे लागतील,’ असेही गोडसे याने सांगितले. त्यानंतर फिर्यादी व गोडसे हे २५ नोव्हेंबर २०१४ रोजी बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज मूकबधीर विद्यालय येथे आले.

गोडसे याने नितीन जाधव व त्यांच्या पत्नीशी फिर्यादीची ओळख करून दिली. त्यांनी फिर्यादीला महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग यांच्याकडील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या बंद असलेल्या आश्रमशाळा अन्य संस्थांकडे हस्तांतरण व स्थलांतर करण्याबाबतचे एक परिपत्रक दाखवले आणि आश्रमशाळेत कामाला लावण्यात येईल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांच्याकडे १४ लाख रुपये दिले. नितीन जाधव यांनी लागलीच दोघांसाठी भक्ती प्रतिष्ठान, बारामती या नावाने पत्र देऊन निवासी आश्रमशाळा, बचेरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील शिक्षक पदाचे नियुक्तिपत्र दिले. मात्र, त्या शाळेत गेले असता आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या मुलाच्या व सुनेच्या लक्षात आले. यानंतर आरोपींनी पैसे देण्यासही नकार दिला. अखेर २६ जून रोजी दोघांविरोधात फिर्याद देण्यात आली.

लष्करात नोकरीच्या अमिषानेही फसवणूक

सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी नितीन जाधव त्याच्यासह आकाश डांगे (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण) या दोघांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक झालेली आहे. त्यानंतर लागलीच जाधव याच्या विरोधात शिक्षक भरतीप्रकरणी बारामतीत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आरोपींनी अशा पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments