Home देश शिवराज मंत्रिमंडळ विस्तार; ज्योतिरादित्यांना हवा मोठा वाटा

शिवराज मंत्रिमंडळ विस्तार; ज्योतिरादित्यांना हवा मोठा वाटा


भोपाळ: मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमडळाच्या विस्तारामध्ये गुंतागुंत वाढत चालली आहे. अनेक मुद्द्यांवर पेच निर्माण झाला आहे. या विस्तारात यांची भूमिका देखील एक गुंतागुंतीचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे आज भोपाळला पोहोचत आहेत. तर, या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवराजसिंह यांच्या मंत्रिमंडळात मोठी भागीदारी हवी आहे. ते एकाही मंत्रिपदाशी तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते. तथापि, आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या गुरुवारी होईल असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा आपल्या अधिकाधिक समर्थकांना मंत्रिंडळात समावेश करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी पक्षाला काही नावेही सुचवली आहेत. यात ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव आणि राज्यवर्धनसिंह दत्तिगाव यांच्या नावांचा समावेश आहे. खरे तर, ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात १६ माजी आमदार आणि ६ माजी मंत्र्यांसह प्रवेश केला आहे. त्या ६ माजी मंत्र्यांना तर मंत्रिमंडळात स्थान मिळेल हे निश्चित आहे. तुलसी सिलावट आणि गोविंदसिंह राजपूत हे मंत्रिमंडळात सहभागी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने ६ जणांव्यतिरिक्त बिसाहूलाल सिंह, एंदलसिंह कंसाना आणि हरदीपसिंह डंग यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते.

शिंदे यांच्या गटातील ‘ही’ नावे निश्चित
या सर्व पैलूंवर विचार केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार गुरुवारी होणार असल्याचे जाहीर केले. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या प्रभारी राज्यपाल आनंदीबेन पटेल या शपथ ग्रहण करणार आहेत. दरम्यान खालील नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत.

१. इमरती देवी
२. प्रद्युम्नसिंह तोमर
३. महेंद्रसिंह सिसोदिया
४. प्रभुराम चौधरी

शिंदेंच्या कोट्यातून असलेले दावेदार

१. बिसाहूलाल सिंह
२. ऐंदलसिंह कंसाना
३. हरदीपसिंह डंग
४. राज्यवर्धनसिंह दत्तीगाव
५. ओपीएस भदौरिया
६. रणवीर जाटव

तर, शिंदे कॅम्पातील २ जण पूर्वीच शिवराज मंत्रिमंडळात सहभागी झालेले आहेत. जलसंधारण मंत्री तुलसी सिलावट आणि अन्न पुरवठा मंत्री गोविंदसिंह राजपूत यांचा यात समावेश आहे.

यांची आहे चर्चा

१. भोपाळ येथून रामेश्वर शर्मा आणि विष्णु खत्री
२. इंदूरहून मालिनी गौड, ऊषा ठाकूर आणि रमेश मेंदोला
३. जबलपूरहून अशोक रोहिणी
४. बालाघाटहून रामकिशोर कांवरे
५. विंध्यहून रामखिलावन पटेल, कंवरसिंह टेकम, केदार शुक्ल आणि गिरीश गौतम
६. मालवा क्षेत्रातून चैतन्य कश्यप, अरविंद भदौरिया, मोहन राठोड, रामल्लू वैश्य आणि नीना वर्मा
७. निवाडहून प्रेमशंकर पटेल आणि सुरेंद्र पटेल
८. बुंदेलखंडहून हरिशंकर खटीक

संघटनेसाठी योग्य काय आहे याचा निर्णय भाजप नेतृत्व घेईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी म्हटले आहे. तो कार्यकर्ता नवीन असो की जुना, मात्र एका प्रक्रियेचे पालन केले जाईल. काही वेळ जाईल, मात्र लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शर्मा म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments