Home ताज्या बातम्या शेतकरी बापाला असा सलाम कुणीच केला नसेल, लेकानं मिळावलेल्या यशाचं तुम्हीही कराल...

शेतकरी बापाला असा सलाम कुणीच केला नसेल, लेकानं मिळावलेल्या यशाचं तुम्हीही कराल कौतुक Uttar Pradesh Board Result 2020 Abhimanyu Verma got second rank in 10th class examination mhkk | Career


शेतकरी वडिलांच्या घामाचं मुलानं केलं चीज, परीक्षेत मिळवलं अव्वल यश

बाराबंकी, 28 जून : आई-वडील शेतकरी आणि शिक्षणाचं वातावरण घरात नसतानाही परीक्षेत अव्वल यश मिळवणाऱ्या अभिमन्यू वर्माचं देशभरात कौतुक होत आहे. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेत अभिमन्यू वर्माने 95.83 टक्के मिळवले आहेत. काही मार्कांसाठी अभिमन्यूचा पहिला क्रमांक हुकला मात्र मिळालेल्या यशानं अभिमन्यूचे शिक्षक आणि वर्मा कुटुंबीय खूप खूश आहेत. अभिमन्यूनं केवळ वर्मा कुटुंबीयांचंच नाही तर गावाचं नावही रोशन केलं.

बाराबंकी इथल्या साई इण्टर कॉलेज आणि महाविद्यालयतील दहावीचा विद्यार्थी अभिमन्यूनं शाळेची मान आणि शान आणखीन उंच केली आहे. अभिमन्यू शेतकरी कुटुंबातून आलेला. घरात फारसं शिक्षण नाही पण तरीही मुलानं शिकून खूप मोठं व्हावं असं आई-वडिलांचं स्वप्न आहे. या स्वप्नांना सत्यात उतरवत पहिली यशाची पायरी मुलानं पार केल्याचा आनंद आहे.

हे वाचा- वडील चालवायचे इलेक्ट्रीकचं दुकानं 16 तास अभ्यास करून मुलानं केलं बोर्डात टॉप

अभिमन्यूने सांगितले की तो दररोज 5 ते 6 तास अभ्यास करत असे आणि त्याच्या यशात शिक्षक आणि मार्गदर्शन कऱणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात डॉक्टर बनून देशासाठी काम करायचे आहे. मिळालेल्या यशाबद्दल खूप आनंदी आहे पण ध्येय मोठे आहे, असं अभिमन्यूनं सांगितलं.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 28, 2020 12:26 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश – bombay high court grants interim protection from arrest...

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक...

covid 19 norms in aurangabad: विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३९ लाखांवर दंड वसूल – more than 39 lakh fine recovered from who violate covid 19 norms...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९...

Nashik News : मुंबईच्या वाहनांना सातपूरचा पर्याय – transport on the flyover from dwarka to meenatai thackeray stadium will be closed soon in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकद्वारका ते मीनाताई ठाकरे स्टेडियम या भागातील उड्डाणपुलावरील वाहतूक लवकरच बंद करण्यात येणार आहे. के. के. वाघ महाविद्यालय ते...

Recent Comments