Home शहरं अहमदनगर शेतीक्षेत्रात ड्रोनच्या वापराला मोठा वाव

शेतीक्षेत्रात ड्रोनच्या वापराला मोठा वाव


म. टा. वृत्तसेवा, राहुरी’आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम पाश्चात्य देशांमध्ये सुरू झाला. भारतात शेतीमध्ये फवारणी, मॅपिंग, पिकांचे निरीक्षण आणि जमिनीच्या मूलभूत घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन वापरला जात आहे. परंतु, शेतीत ड्रोनचा आणखी वापर वाढविण्यासाठी संशोधन व विकासावर भर द्यावा लागेल,’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ‘कास्ट-कासम’ प्रकल्पाच्या वतीने ‘काटेकोर शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मूलतत्त्वे’ या विषयावर एक आठवड्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी डॉ. मायंदे बोलत होते. डॉ. मायंदे म्हणाले, ‘ड्रोन व विविध प्रकारच्या सेन्सरच्या सहायाने जमिनीतील व पिकातील अन्नद्रव्यांची माहिती संकलित करता येते. संकलित केलेल्या या माहितीचे एकत्रित विश्लेषण करून तिला मशीन लर्निंगची जोड दिली. पिकांना आपोआप योग्य प्रमाणात खते, कीटकनाशके आणि पाणी देता येऊ शकते. शेतीला तंत्रज्ञानाची गरज आहे. भारतातील ड्रोन कंपन्यांसाठी एखाद्या विशिष्ट कामासाठी कमी खर्चात ड्रोनची निर्मिती करून ते शेतापर्यंत नेण्याचे आव्हान आहे. येत्या काही वर्षांत ड्रोन शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्यासाठी असलेल्या कस्टम हायरिंग सेंटरचा भाग असतील.’ समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा ऑनलाइन उपस्थित होते. या वेळी संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार; तसेच सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, डेप्युटी जनरेल मॅनेजर, काटेकोर शेती, महिंद्रा अँड महिंद्रा मुंबईचे स्वानंद गुधाटे, असाप अॅग्रीटेक ललप, नाशिक अजित खर्जुल, बँकॉक शशांका मालगामा आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते.डॉ. विश्वनाथा म्हणाले सध्या लॉकडाउनमुळे प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. शेतीतील यांत्रिकीकरण वाढण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात वाढणार आहे. ड्रोनच्या सहाय्याने विविध आपत्तींमध्ये होणारे पीक नुकसानीचे मूल्यमापन अचूकपणे करून इन्शुरन्सचा फायदा शेतकऱ्यांना करून देता येऊ शकतो. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनील गोरटीवार यांनी केले. या वेळी डॉ. शरद गडाख व स्वानंद गुधाटे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी सहभागी प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीषकुमार भणगे यांनी केले. प्रकल्प सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशातील ७०० प्रशिक्षणार्थींनी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणासाठी समन्वयक म्हणून डॉ. गिरीषकुमार भणगे, अभियंता योगेश दिघे व मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

maharashtra budget session live updates: Maha Vikas Aghadi Government Prepared To Handle Opposition – Maharashtra Budget Session Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

हायलाइट्स:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणांची शक्यतामराठा आरक्षण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

Recent Comments