Home देश पैसा पैसा श्रीमंतांच्या संपत्तीला करोनाचा संसर्ग; दिग्गजांची मालमत्ता घटली

श्रीमंतांच्या संपत्तीला करोनाचा संसर्ग; दिग्गजांची मालमत्ता घटली


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशात करोनाचे प्रमाण वाढू लागल्यानंतरच्या दोन महिन्यांत देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही १९ टक्के घट झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यात त्यांची संपत्ती १८ टक्क्यांनी वाढली आहे. करोनाकाळात भारतीय उद्योगपतींपैकी सीरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. जागतिक स्तरावर संपत्तीमध्ये जलद वाढ होण्याच्या बाबतीत पूनावाला पाचव्या क्रमांकावर आहेत.

सद्य परिस्थितीत भारतातील चार उद्योगपती जगभरातील सर्वांत श्रीमंत १०० व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी जगभरातील १० सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थिरावले आहेत. करोना काळाच्या पहिल्या दोन महिन्यांत त्यांच्या संपत्तीमध्ये १९ टक्क्यांची घसरण दिसून आली, मात्र, नंतरच्या दोन महिन्यांत त्यांच्या संपत्तीमध्ये १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात त्यांच्या संपत्तीत एक टक्का घट झाली आहे. हुरून रिपोर्टच्या एका अहवालानुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती ६६ अब्ज डॉलर आहे. गेल्या दोन महिन्यांत जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १.१६ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजने राइट इश्यूच्या माध्यमातून ५३,००० कोटी रुपयांचा निधीही प्राप्त केला आहे. १.१७ लाख कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने कंपनी कर्जमुक्त झाल्याने समभाग आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.


जेफ बेझोसना सर्वाधिक फायदा
करोना काळात जगभरात सर्वाधिक फायदा कुणाला झाला असेल, तर तो अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना…करोनाकालात बेझोस यांच्या संपत्ती २० अब्ज डॉलरची भर पडली असून, त्यांची एकूण संपत्ती १६० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सध्या ते जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये १४ टक्क्यांची भर पडली आहे.


पूनावाला पाचव्या क्रमांकावर
करोनाकालात भारतीय उद्योगपतींपैकी सीरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. जागतिक स्तरावर संपत्तीमध्ये जलद वाढ होण्याच्या बाबतीत पूनावाला पाचव्या क्रमांकावर आहेत. हुरून रिसर्चच्या अहवालानुसार ३१ मे २०२०पर्यंत अब्जाधीशांच्या यादीमध्ये पूनावाला जगातील ८६वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. आपल्या आधीच्या क्रमवारीत ५७ अंकांची उडी मारून त्यांनी हे स्थान कमावले आहे. करोना काळातील चार महिन्यांत त्यांच्या संपत्तीमध्ये २५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. हुरून रिसर्चच्या अहवालानुसार ३१ मे २०२०पर्यंत त्यांची एकूण संपत्ती १५ अब्ज डॉलर आहे.

अदानींना १८ टक्के फटका
जगभरातील सर्वांत श्रीमंत १०० व्यक्तींच्या यादीत भारताचे आणखी दोन उद्योगपती आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि एचसीएलच्या शिव नाडर यांचाही यादीत समावेश होतो. करोना काळात अदानींच्या संपत्तीत १८ टक्क्यांची आणि नाडर यांच्या संपत्तीमध्ये ६ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. ३१ मे २०२०ला अदानी यांची एकूण संपत्ती १४ अब्ज डॉलर आणि नाडर यांची एकूण संपत्ती १६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments