Home शहरं मुंबई संवादसेतू- प्रवीण बांदेकर

संवादसेतू- प्रवीण बांदेकरआपले जगणे हे काळ आणि अवकाश या दोन मितींमध्ये सुरू असते असे मानले तर सध्याचा काळ हा स्थिर झालेला आहे आणि अवकाश बंदिस्त झालेला आहे असे अनुभवास येते आहे. पण खरे तर काळ वाहतोच आहे. ‘काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे’ हे सांगणाऱ्या भवभूतीने काळ आणि अवकाशाबद्दल एक महत्त्वाचे विधान केलेले आहे. काळ हा चिरंतन आहे. त्याचा उगम नाही, अंतही नाही. तो चक्राकार आहे की एकरेषीय आहे हे नंतरचे प्रश्न. मात्र, काळाच्या या गतीची आपण आपल्या जगण्याच्या गतीशी सांगड घालत असतो. आपण काळाच्या गतीशी जैविकरीत्या जोडलेले असतो. काळाची लय आणि आपल्या जैविक अस्तित्वाची लय या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. सध्याची अस्वस्थता ही काळ वाहतो आहे, पण काळाच्या मितीवर आपण स्थिर झालेलो आहोत यामुळे आलेली असावी काय? आपली वेगवेगळ्या प्रकारे सुरू असलेली धडपड ही काळाच्या गतीशी जोडून घेण्याकरता आहे काय? मग जगण्याची गती म्हणजे काय हे जाणून घ्यायला नको काय? आपली गतीची संकल्पना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या काळ-काम-वेगाच्या गणितासोबत घट्ट बांधलेली आहे. तिची सोडवणूक करता येईल काय? काळाच्या मितीवर अनुभवास येणाऱ्या या स्थिरतेमध्ये नेमके काय दडलेले आहे याचा शोध घ्यायला नको काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.या स्थिर अवस्थेत आपण जर स्वतःला आपल्या मर्यादित अवकाशात बांधून घेतले तर अज्ञानातील सुखात काळ व्यतीत होईल. मात्र, आपल्या अवकाशाबाहेर बघू लागलो तर या स्थिरतेने केलेल्या वाताहतीची कल्पना येईल. जगण्याच्या या तात्पुरत्या थांबलेल्या गतीने अनेकांचे अवकाश उद्‌ध्वस्त केलेले दिसून येतील. काळ पुढे जातो आहे, पण जगणे थांबलेले आहे. ते थांबू नये याकरता आणि जगण्याला गती देण्याकरता सुरू असलेली लाखो लोकांची धडपड दिसेल. मैलो न्‌ मैल पायी चालत जाणारे हजारो पाय दिसतील. चंबूगबाळे डोक्यावर घेऊन जाताना हायवेच्या बाजूला किंवा रेल्वेरुळावरच क्षणभर टेकलेली माथी दिसतील. कुठेच काही नसूनही कशाची तरी वाट पाहणारे सताड उघडे डोळे दिसतील. गावाच्या ओढीने खेचून रेल्वे स्टेशनवर आलेली हजारो माणसे दिसतील. पाठीवर म्हाताऱ्या आईला घेऊन महामार्गावरून निघालेला तरुण दिसेल. तळपत्या उन्हात कडेवर लहानग्या मुलीला घेऊन बॅग ओढत जाणारी आई दिसेल. घशाला पडणारी कोरड घालवण्यासाठी हातात धरलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत डुचमळणारे पाणी दिसेल. पोटातली भूक, मातीची ओढ, मरणाची भीती या सगळ्यातून सुरू झालेला हा परतीचा रस्ता नसलेला प्रवास आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर घाव घालणारी, समाजातल्या लहानमोठ्या सगळ्या वर्गावर कोसळलेली ही असुरक्षिततेची कुऱ्हाड आहे. उद्याचे नंतर, आज-आत्ताचे काय हा अनुत्तरित प्रश्न भेडसावतो आहे. एक प्रकारे ही काळाशी मांडलेली शर्यत आहे. काळ आणि अवकाशाचे नाते एका आपत्तीने विस्कटल्यामुळे पुन्हा सगळी बांधाबांध करावी लागणार आहे. ही अवस्था नक्कीच जाईल आणि खूप नासधूस करून जगण्याचा प्रवाह मोकळा होईल. मात्र, कोसळल्यानंतरचा सगळा मलबा दूर करून, आपापल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या क्षुद्र गोष्टी बाजूला ठेवून, यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांच्या कामास येणारा एक पूल बांधावा

लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments