Home संपादकीय सगूण- निर्गुण: सगुण-निर्गुण अर्थाचा शोध - saguna nirguna the search for meaning

सगूण- निर्गुण: सगुण-निर्गुण अर्थाचा शोध – saguna nirguna the search for meaning


वासंती वर्तक

अर्थाचा शोध

मला एक प्रश्न पडायचा. रसिक नेहमी साहित्यिक, कलाकार, चित्रकार यांच्यावर एवढे प्रेम का करतात?

का वेडे होतो आपण त्यांच्यासाठी? त्यांच्या कलाविष्काराच्या आनंदात डुंबण्यासाठी? या सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याच्या वाटेवर त्या उत्तराचा थोडासा अंदाज येऊ लागलाय असं वाटतं. निर्गुणाचा अनुभव मग त्याला नाव काहीही असो, तो घेणे आपल्या आवाक्‍यात आहे का? आपला तेवढा अधिकार आहे का? मग आपल्याला दुष्प्राप्य असणारी ती अनुभूती जर कवी शब्दातून, चित्रकार रेषांतून आणि गायक सूरांमधून शोधत असेल तर त्याचं बोट धरून जावं आपण पुढे पुढे.. बघू काय गवसतं ते.

समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे, कवी सृष्टीचा अलंकार। कवी लक्ष्मीचा शृंगार। सकळ सिद्धीचा निर्धार। ते हे कवी।। कवी देवांचे रूपकर्ते। कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते। नाना शास्त्रांचे सामर्थ्याते। कवी वाखाणिती।।

यातलं देवांचे रूप कर्ते हे फार महत्त्वाचे आहे. ज्ञानदेवांनी गणपतीला शब्द ब्रह्मरूप म्हटले. कवी, लेखक अनुभवांची खाण खणून, पैलू पाडून रत्नं आपल्यासमोर मांडतात. त्यातल्या प्रत्येक कथेचा पैस वेगळा. प्रत्येक कवितेचा जीवनगंध निराळा.

आपल्याला असे किती अनुभव येणार? म्हणून तर आपण साहित्याकडे धावतो. जीवनाच्या घटित-अघटित मर्यादा, अटळ भोगांची अपरिहार्यता जाणतो. साहित्याच्या विशाल पटावरून लुटुपुटीच्या लढाईत त्यांना सामोरे जातो. एक खोल समज झिरपते आयुष्याची. आणि सूक्ष्म तरल समंजसपणाकडे वाटचाल होते. कबीर म्हणतो ना.. करत विचार, मनही मन उपजी। ना कही गया ना आया।। अशी ही अवस्था. म्हणजे एखादा अनुभव लेखकाला किती तीव्रपणे जाणवला, कसा आकारत व्यक्त झाला, रसिकाला किती भावला? त्याची पावती रसिकानं दिली का? इथे हे वर्तुळ पुरे झाले.

ग्रेस यांची गूढवाट असेल. खानोलकर, जीएंच्या कथनामधला चकवा. कुठेतरी या निर्गुणाचा झंकार ऐकू येतोच. त्याच्या नादाचा पायरव जाणवतो. रवींद्रनाथ म्हणतात त्याप्रमाणे ते शब्द काजव्याप्रमाणे लुकलुकतात हृदयात. निराशेच्या संधिप्रकाशात अर्थ शोधण्यासाठी। माझे ते शब्द अबोल राहिलेले।। (अनु. नरेंद्र जाधव) हे आपल्यालाही स्पष्टपणे जाणवतं. अगदी खोलवर. भले ते अगम्य, अगोचर, अव्यक्त असेल. त्याची चिमूट आपल्या वाट्याला येतेच येते. मग शंकर वैद्य जेव्हा विचारतात, ‘पुस्तक भुरुभुरू वाहणारा वारा होतात आणि विचारतात श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस का’ ‘आणि मी तोंडभर हसून मनापासून त्यांना हो’ असं सांगते. तुम्ही पण सांगता ना?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments