Home संपादकीय सय्यद अली गिलानी: फुटिरतावादी - separatist from kashmir political party sayyad ali...

सय्यद अली गिलानी: फुटिरतावादी – separatist from kashmir political party sayyad ali gilani


नोंद : सय्यद अली गिलानी

काश्मीर खोऱ्यातील सर्व फुटिरतावादी राजकीय गटांची संघटना असलेल्या हुरियत कॉन्फरन्सपासून फारकत घेण्याची घोषणा केल्यामुळे, ९१ वर्षांचे सय्यद अली गिलानी चर्चेत आले आहेत. हुरियत कॉन्फरन्समधील अंतर्गत परिस्थितीमुळे आपण वेगळे होत असल्याची घोषणा त्यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे केली.

त्याचवेळी हुरियतच्या नेते आणि कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी, प्रकृती किंवा सरकारच्या कठोर भूमिकेमुळे वेगळे होत असल्याच्या चर्चेचा साफ इन्कार केला आहे. यापुढील काळातही भारत सरकारला विरोध कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. १९९३ साली वीसहून अधिक धार्मिक आणि राजकीय पक्षांनी ‘ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स’ची स्थापना केली. मीरवाइज उमर फारूख तिचे संस्थापक अध्यक्ष बनले. नंतरच्या काळात गिलानी अध्यक्षपदी आले.

सोपोर मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते आणि सलग १८ वर्षे आमदार होते. काश्मीर विधानसभेचा कालावधी तेव्हा सहा वर्षांचा होता. जमात-ए-इस्लामी पक्षाचे ते प्रतिनिधित्व करीत. ‘हुरियत’मध्ये उमर फारूख आणि गिलानी असे गट असून, यापैकी फारूख गट हा मवाळ व भारतधार्जिणा, तर गिलानीगट पाकिस्तानवादी आहे. मधल्या काळात गिलानी यांना कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. तशी बैठकही पार पडली होती.

‘काश्मीरमध्ये सोन्याने मढवलेले रस्ते बांधले, तरी आम्हाला भारतात राहायचेच नाही,’ असे म्हणणाऱ्या आणि सध्या अनेक चौकशांना तोंड देणाऱ्या गिलानींचे राजकारण आता कसे वळण घेते, ते कळेलच. त्यांना हुरियतमधून कोणी व कसे घालवले, याच्या कथाही लवकरच येऊ लागतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

Recent Comments