किरण कुमार करोना पॉझिटिव्ह, केलं क्वारन्टीन
आशीष यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते इस्पितळात भरती असल्याचं सांगितलं होतं. सध्या डायलिसिससाठी ते आयसीयूमध्ये भरती आहेत. त्यांनी फेसबुक मार्फत मित्र- मैत्रिणींना आणि चाहत्यांना सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मित्र करत आहेत मदत-
फेसबुकवरील पोस्ट पाहून अनेकांना त्यांना मदत केली. आशीष यांचे मित्र सूरज थापर यांनी त्यांची फार मदत केली. याबद्दल सांगताना ते म्हणाले की, ‘सध्या मी डायलिसिसवर आहे. प्रकृतीत बराच सुधारही आला आहे. असं असलं तरी अजून काही गोष्टी आहेत ज्यावर डॉक्टर काम करत आहेत. मला नाही माहीत अजून कितीी दिवस इस्पितळात रहावं लागेल. इथे इस्पितळाचं बिलही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.’
दिग्दर्शकाच्या नातेवाईकाचा करोनाने मृत्यू
अपेक्षा आता फक्त सलमान खानकडून-
आशीष पुढे म्हणाले की, ‘सोशल मीडियावर बँक अकाउंट शेअर करूनही मला पुरेशी मदत नाही मिळाली. सूरज माझी मदत करत आहे. पण लॉकडाउनमुळे त्यालाही अनेक अडथळे येत आहेत. आता माझी शेवटची आस सलमान खानकडून आहे. मला कोणत्याही माध्यमातून त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या फाउंडेशनपर्यंत पोहोचायचं आहे. जेणेकरून ते मला काही मदत करू शकतील.’
कुटुंबात फक्त बहीण-
कुटुंबाबद्दल विचारले असताना आशीष रॉय यांनी सांगितले की, ‘माझी फक्त बहीण असून लग्नानंतर ती कोलकत्यात राहते. लॉकडाउन आणि वादळामुळे तिचं मुंबईत येणं जवळपास अशक्य आहे. माहीत नाही माझं नशिब मला कुठे घेऊन जात आहे.’
या वर्षाच्या सुरुवातीला आशीष यांना आजारपणामुळे इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरात ९ लिटर पाणी जमा झालं होतं. मोठ्या प्रयत्नांनी डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातलं पाणी काढलं. आजारपणासोबतच आशीष रॉय अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. २०१९ मध्ये त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला होता. यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मालिकांमध्ये कोणीही काम दिलं नाही. जमापूंजीवर आशीष यांनी अनेक वर्ष काढली.