Home मनोरंजन सलमान खान: सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्याने केले गंभीर आरोप...

सलमान खान: सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्याने केले गंभीर आरोप – aansh arora lodge complain against salman khan films salman khan


मुंबई- सलमान खानचं प्रोडक्शन हाउस सलमान खान फिल्म्स आपल्या आगामी सिनेमांसाठी कास्टिंग करत असल्याचं म्हटलं जात होतं. पण यात कोणतंही तत्थ नसल्याचं समोर आलं. स्वतः सलमानने यासंबंधी ट्वीट करत माहिती दिली. या काळात फिल्म प्रोडक्शन कोणत्याही प्रकारचं कास्टिंग होत नसल्याचं आणि त्यासाठी कोणत्याही कास्टिंग एजेन्टला हायर केलं नसल्याचं त्याने ट्वीटद्वारे स्पष्ट केलं.

अंश इरोराला आले अनेक फोन, मेसेज आणि ईमेल-

या ईमेलच्या जाळ्यात अभिनेता अंश अरोरा अडकला. सलमान खान फिल्म्सच्या वतीने त्याला अनेक कॉल, मेसेज आणि ईमेलही आले. यातील एका ईमेलमध्ये सलमानचा आगामी टायगर जिंदा है ३ सिनेमात त्याला नकारात्मक भूमिका देण्याबद्दल सांगण्यात आले. याशिवाय ईमेलमध्ये ऑडिशनसोबत दिग्दर्शक प्रभुदेवासोबत मीटिंग ठेवल्याचाही उल्लेख आहे.

अंश अरोराला आलेला ईमेल

मुंबईत दाखल केली तक्रार-

यानंतर अंश अरोराने मुंबईतील एका पोलीस ठाण्यात जाऊन सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार नोंदवली. अंशच्या मते, त्याची फसवणूक झाली असून त्याच्या आगामी प्रोजेक्टसोबतही फसवणून झाली आहे.

सलमान खानने केलं होतं स्पष्ट-

याआधी सलमान खानने एक ट्वीट करून स्पष्ट केलं होतं की, ‘मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी किंवा सलमान खान फिल्म्स सध्या कोणत्याही सिनेमासाठी कास्टिंग करत नाही. आगामी सिनेमांसाठी आम्ही कोणत्याही कास्टिंग एजन्टला हायर केलेलं नाही. यासंबंधी कोणताही ईमे, मेसेज किंवा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका, जर चुकीच्या पद्धतीने कोणी माझं किंवा सलमान खान फिल्म्सच्या नावाचा वापर करत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments