Home ताज्या बातम्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील गहिवरले, बोलताना अश्रू अनावर VIDEO...

सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील गहिवरले, बोलताना अश्रू अनावर VIDEO | Maharashtra


शेवटी श्रद्धांजली वाहून त्यांनी कातरलेल्या स्वरात आपलं बोलणं संपवलं. त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

सांगली 18 ऑक्टोबर:  आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील हे भावूक झाले. शिवाय त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचं रविवारी पाहायला मिळालं. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात गेले होते. यावेळी बोलताना त्यांना गहिवरून आणि त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोकं जेव्हा अकाली निघून जातात तेव्हा खूप दुःख होती अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली.

कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जाणत्या लोकांचा या काळात मृत्यू झाला.

कोरोनाचं संकट आणि त्यात जबाबदारी योग्यपणे सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं. त्यांच्याबद्दल बोलतांना त्यांना शब्दच फुटत नव्हते. शेवटी श्रद्धांजली वाहून त्यांनी कातरलेल्या स्वरात आपलं बोलणं संपवलं. त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 18, 2020, 4:25 PM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MAH MCA CET 2020: MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी – mah mca cet 2020 admit card released, download here

MAH MCA CET 2020 Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट...

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments