Home ताज्या बातम्या 'सही रे सही' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मुंबईत घेतला अखेरचा श्वास sahi...

‘सही रे सही’ फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मुंबईत घेतला अखेरचा श्वास sahi re sahi fame actress geetanjali kambali died of cancer on saturday mhjb | News


मनोरंजन विश्वासाठी एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दु:खद बातम्या 2020 या वर्षात समोर येत आहेत. मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक घटना आज घडली आहे. ‘

मुंबई, 24 ऑक्टोबर : मनोरंजन विश्वासाठी एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दु:खद बातम्या 2020 या  वर्षात समोर येत आहेत. मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक घटना आज घडली आहे. ‘सही रे सही’ (Sahi Re Sahi) फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी (Geetanjali Kambali) यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या.

गीतांजली कांबळी यांच्यावर मुंबईमधील चर्नीरोड याठिकाणी असणाऱ्या सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. गीतांजली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण याठिकाणच्या होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी त्यांची अशी ओळख मिळवली होती.  मात्र त्यांना या काळात कॅन्सरने ग्रासले होते, गेला काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.

(हे वाचा-ड्रग्जसंबंधी चौकशीनंतर दीपिका पहिल्यांदाच झाली व्यक्त; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल)

केदार जाधव दिग्दर्शित ‘सही रे सही’ या नाटकात अभिनेता भरत (Bharat Jadhav) जाधवबरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकातही त्यांची भूमिका गाजली होती.  गीतांजली यांनी 50 हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे.

बातमी अपडेट होत आहे


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 24, 2020, 11:43 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती धुरा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड प्रभावित राज्यांतून महाराष्ट्रात हवाई आणि रेल्वेमार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे असून, संसर्ग नसलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेशास...

Recent Comments