Home ताज्या बातम्या सांगलीतील PHOTO व्हायरल, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या गाडीवरून पडळकरांचा फेरफटका, Gopichand Padalkar with NCP...

सांगलीतील PHOTO व्हायरल, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या गाडीवरून पडळकरांचा फेरफटका, Gopichand Padalkar with NCP corporator PHOTO viral in Sangli mhas | News


एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला जात असतानाच सांगलीतील जतमध्ये मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

सांगली, 26 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांचा निषेध करत जोरदार निदर्शने केली. एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला जात असतानाच सांगलीतील जतमध्ये मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

जतमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकानेच चक्क गोपीचंद पडळकरांसोबत दुचाकीवर फेरफटका मारल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असतानाच जतमध्ये मात्र राष्ट्रवादीचा नगरसेवक पडळकर यांच्यासोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसंच या फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी आणि पडळकर संघर्ष

शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळत आंदोलन केलं. तसंच पडळकर यांना राज्यभरात फिरकू देणार नाही, अशी भूमिका घेतली.

पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार?

गोपीचंद पडळकर यांच्या विखारी टीकेला शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पुण्यात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांकडून शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांच्या टीकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी पडळकरांना थेट उत्तर देण्याचं टाळलं. ‘मला बोलायचं आहे…पण आता नाही…लवकरच सविस्तर बोलेन,’ असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर लगेचच प्रतिहल्ला करण्याचं टाळलं.

First Published: Jun 26, 2020 11:15 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

Recent Comments