अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेल्या गोपनीय दस्ताऐवजात ही माहिती समोर आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनच्या नेत्यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच करोनाच्या महासंकटाची माहिती जगापासून लपवून ठेवली. अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळालेले गोपनीय दस्ताऐवज हे चार पानी असून त्यावर एक मे रोजीची तारीख आहे. ट्रम्प प्रशासनाकडून सातत्याने चीनवर आरोप होत असतानाच हा खुलासा झाला आहे. जवळपास संपूर्ण जानेवारी महिना चीनने करोनाची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली नाही. त्यावेळी चीनने परदेशातून फेस मास्क, पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय साधनसामुग्री मागवली असल्याचा दावा गोपनीय अहवालात करण्यात आला आहे.
वाचा: वाचा:
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी सांगितले की, जगभरात करोनाच्या झालेल्या संसर्गाला चीन जबाबदार आहे. त्यामुळेच त्यानाच प्रश्न विचारले पाहिजे. मात्र, अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासन चीनवर आरोप करत आहे. चीन हा अमेरिकेचा राजकीयदृष्ट्या शत्रू असला तरी अमेरिका-चीनमध्ये असलेल्या व्यापारी संबंधाकडेही लक्ष वेधले आहे. अमेरिकन सरकारने करोनाच्या संकटाला गांभीर्याने घेतले नसल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे.
आणखी वाचा: