Home मुंबई नवी मुंबई सिडकोच्या नळजोडणीधारकांना दिलासा

सिडकोच्या नळजोडणीधारकांना दिलासा



पुढील सहा महिने जुन्या दराने देयके

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

सध्या जगभर पसरलेल्या करोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाने पाण्याची देयके सुधारित दराने वसूल करण्याचा निर्णय सहा महिने पुढे ढकलला आहे. ग्राहकांना या निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित देयके दिली जाणार नाहीत. सुधारित दरानुसार यापूर्वी आकारण्यात आलेली देयकाची अतिरिक्त रक्कम पुढील देयकामध्ये जुन्या दरांनुसार आकारण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. या निर्णयामुळे सिडको हद्दीतील २६ हजार ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

अन्य सरकारी यंत्रणांकडून पाण्याची खरेदी व त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याची साधने आणि पाइपलाइन्सच्या देखभालीसाठी येणारा खर्च लक्षात घेता ही दरवाढ तब्बल १५ वर्षांनंतर म्हणजेच बऱ्याच कालावधीने करण्यात आली होती, असे ते म्हणाले.

नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळ जोडण्यांसाठी आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांसाठी फेब्रुवारी-मार्च २०२०च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात आले होते. ही दरवाढ जानेवारी २०२०पासून करून फेब्रुवारी – मार्च २०२०च्या देयकात समाविष्ट करण्यात आली होती.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

4th Marathi literary meet: संमेलनस्थळी होणार करोना चाचणी – it has been decided to test the corona of every worker those work for marathi...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, संमेलनाच्या उभारणीसाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराची...

Rajesh Tope: आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढवा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश – rtpcr testing should be increased to prevent coronavirus says health minister rajesh tope

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, असे आदेश...

खुनाचा प्रयत्नप्रकरणी पतीला शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पती, सासू,...

Recent Comments