Home मनोरंजन सीक्रेट्स ऑफ लव्ह: ओशोंच्या भूमिकेत असलेल्या या सुपरस्टारला ओळखलं का? - ravi...

सीक्रेट्स ऑफ लव्ह: ओशोंच्या भूमिकेत असलेल्या या सुपरस्टारला ओळखलं का? – ravi kishan to play osho in secrets of love movie


मुंबई- अध्यात्मिक जगतात भारतातील गुरू आचार्य रजनीश यांचं नाव नेहमीच वादात राहिलेलं आहे. आचार्य रजनीश यांना ओशो म्हणूनही ओळखलं जातं. आतापर्यंत ओशोंवर बरेच माहितीपट आणि लघुपट बनवले गेले आहेत. आता त्यांच्या आयुष्यावर एक हिंदी सिनेमाही होत आहे. यात अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन ओशोंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात ओशोच्या जीवनाशी संबंधित वादग्रस्त बाबी दिसतील.

या सिनेमाचं नाव ‘सिक्रेट्स ऑफ लव्ह’ असं असेल. दिग्दर्शन रितेश एस. कुमार सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमात ओशोंचं तत्त्वज्ञान, त्यांचा जीवन प्रवास आणि जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेतील सरकारसोबतचा वाद यांसारख्या महत्त्वाच्या घटना यात असणार आहेत. या सिनेमाविषयी बोलताना रवी किशन म्हणाले की, ‘जेव्हा तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्यास सांगितलं जातं जे केवळ वादग्रस्तच नाही तर लोकप्रियही आहे, तेव्हा ती फार मोठी जबाबदारी असते. ओशोंची व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल फार गोष्टी वाचाव्या लागल्या आणि त्यांच्याबद्दल संशोधनही करावं लागलं.’

Photo: दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना

पुढे बोलताना रवी किशन म्हणाले की, ‘जेव्हा मी रितेशला मला या भूमिकेसाठी का निवडले हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की माझे डोळे ओशोंसारखे वाटतात. ओशोंच्या गेटअपमधला माझा फोटो त्यांनी पाहिला. ओशोंची भूमिका साकारताना मला खूप मजा आली. ‘

ओशो आणि त्यांची पर्सनल सेक्रेटरी मां आनंद शीला यांच्यावर अनेकदा चित्रपट बनविण्यासाठी चर्चा याआधीही झाली आहे. २०१८ मध्ये अशी चर्चा रंगली होती की शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली एक चित्रपट तयार केला जाऊ शकतो ज्यात आमिर खान ओशो आणि आलिया भट्ट मां आनंद शीलाची भूमिका साकारू शकेल. पण त्यानंतर या सिनेमाचं पुढे काहीच चर्चा झाली नाही.

तैमुरचं नाव बदलणार होता सैफ, आता दुसऱ्या मुलाचं काय ठेवणार नाव

एवढंच नाही तर २०१९ मध्ये प्रियांका चोप्रानेही तिला मां आनंद शीलाच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे असं सांगितलं होतं. मात्र, आनंद शीला यांनी याला परवानगी दिली नाही आणि प्रियंकाला कायदेशीर नोटीस पाठविली.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Suraj Mandhare: तलाठ्यांना पुन्हा मिळणार लॅपटॉप – laptops will be distributed to villages talathi says nashik district collector suraj mandhare

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककंत्राटात निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा उच्च दर्जाचे लॅपटॉप असल्यानेच ते तलाठ्यांकडून परत घ्यावे लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हे...

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Mumbai Public Schools: पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात – admission process started in cbse mumbai public schools of bmc

Admissions for BMC's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

Recent Comments