Home मनोरंजन सुखांच्या सरींनी हे मन बावरे: पुन्हा एकदा कलाकारांनी मानधनासाठी उठवला आवाज, जाणून...

सुखांच्या सरींनी हे मन बावरे: पुन्हा एकदा कलाकारांनी मानधनासाठी उठवला आवाज, जाणून घ्या पूर्ण प्रकरण – marathi actors rise their voice for payment on social media


संपदा जोशी

साधारण दोन वर्षं ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका सुरू होती. अभिनय, दिग्दर्शन, मांडणी या सगळ्यात मालिका सरस ठरली होती. पण आता ही मालिका संपून चार महिने होत आले तरी त्यातील काही कलाकार आणि तंत्रज्ञांना त्यांचं मानधन मिळालं नाहीय. याविरोधात काही कलाकारांनी सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडली आहे. तर मालिकेचा दिग्दर्शक-निर्माता मंदार देवस्थळीनं देखील त्याची बाजू सांगितली आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता शशांक केतकरनं मानधन वेळेवर मिळत नसल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याच्या या पोस्टची ‘मुंटा’नं दखल घेतली होती. नियोजनाप्रमाणे चित्रीकरण करून नंतर पैसे देण्याची वेळ आल्यावर कलाकारांच्या पदरी मात्र निराशाच पडते, हे चित्रं सातत्यानं दिसू लागलं असून कलाकारही आता या विरोधात बोलू लागले आहेत.


‘हे मन बावरे’ मालिकेतील मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत, संग्राम समेळ, विदिशा म्हसकर या कलाकारांनी मानधन न मिळाल्याने ‘मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. या सगळ्यांच्या पोस्टला बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे मालिकेचा निर्माता आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळीनं देखील त्याची बाजू मांडली आहे. त्याच्या पोस्टवरही अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मानधन थकवल्याबद्दल अनेक कलाकार वेळोवेळी बोलत असतात. पण यासाठी विशिष्ट यंत्रणा नसल्यानं आणि कलाकारांमध्ये एकजूट नसल्यानं या विषयात पुढे ठोस पावलं उचलली जात नाहीत, अशी नेहमी खंत व्यक्त केली जाते. आता मात्र या मालिकेतले कलाकार एकत्र आले असून त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला आहे. तसंच मंदारनंही त्याचं म्हणणं सांगितलं आहे. आता यापुढे काय होतंय हे नंतरच कळेल.


परिस्थिती लक्षात घेऊन मानधन मिळेल; याची वाट बघायचं आम्ही ठरवलं. पण आमच्याच मालिकेतल्या एका कलाकाराच्या मानधनाशी निगडीत पोस्टनंतर त्याला मानधन मिळालं. ‘थेट बोलून काम होतं का?’ असा विचार आमच्या मनात येणं सहाजिक होतं. मंदार दादानं आम्हाला फसवलं किंवा त्यानं आमचे फोन उचलले नाहीत, असं अजिबात नाही. त्यानं परिस्थितीची जाणीव आम्हाला करून दिली आहे. पण बोलून पैसे मिळत असतील तर आपणही बोलून बघू, असा विचार आला आणि एकत्रं व्यक्तं व्हायचं ठरवलं.

– संग्राम समेळ, अभिनेता


आम्ही जुलै पासून मानधन मागत आहोत. मंदार एक उत्तम माणूस आहे. पण व्यावसायिक म्हणून काय? आम्ही माणूसकी म्हणून प्रत्येक परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहिलो. चॅनलशी सुद्धा आम्ही त्याच्यासाठी वारंवार बोललो आहोत. आम्ही त्याच्यावर खूप विश्वास ठेवला; पण आम्हाला काय मिळालं? विश्वासघात? आम्हाला कोणालाही भावनिकरित्या तोडायचं नाही. पण हक्काचे पैसे मिळत नाही तर आम्ही काय करायचं? स्वतःच्या कामाचा मोबदला हा असा मागावा लागतोय.

– शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री


मला कोणाचेही पैसे बुडवायचे नाही. तसंच कोणाला फसवायचंही नाहीये. मी आता आर्थिक संकटाला सामोरा जातोय. या परिस्थितीत मला थोडासा वेळ हवाय; जेणेकरून मी काम करून सगळ्यांचे पैसे देऊ शकेन. मी परिस्थितीपासून पळून जाणारा माणूस नाही आणि मी तसं करणारही नाही. त्यामुळे जे काही आहे ते सगळ्यांशी बोलून माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करतोय.

– मंदार देवस्थळी, निर्माता-दिग्दर्शक

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

Recent Comments