Home शहरं पुणे सुती कापडाचा साधा मास्क वापरला तरी चालेल

सुती कापडाचा साधा मास्क वापरला तरी चालेलप्रश्न : घराबाहेर पडणारी मंडळी परतल्यावर त्यांच्याकडील वस्तू, त्यांचे कपडे (उदा. बॅग, सॅक, पिशवी, किल्ली इ.) यांमुळे करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे का? या गोष्टी निर्जंतुक कशा करायच्या? त्यासाठी काही स्प्रे असतो का? असल्यास तो घरी करणे शक्य आहे का? किंवा घरच्या घरी या गोष्टी निर्जंतुक कशा करता येतील?उत्तर : सध्या लॉकआउट असल्यामुळे बाहेर पडूच नका. अत्यावश्यक सेवांमधील मंडळी बाहेरून घरी आल्यावर कपडे, मोजे, कापडी पिशवी चमचाभर डेटॉल, सॅव्हलॉन असे जंतुनाशक औषध बादलीभर पाण्यात टाकून वेगळ्या बादलीत १० मिनिटे भिजत ठेवावेत आणि नेहमीप्रमाणे धुवावेत. बॅग, सॅक अशाच नेहमीच्या जंतुनाशकांनी पुसून घ्याव्यात. इतर गोष्टींसाठी डेटॉल, लायझॉल, ओडोबॅन असे जंतुनाशक स्प्रे मिळतात. त्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतील.प्रश्न : शुद्ध, साजुक तुपाने दोन्ही नाकपुड्यांना आतून हाताच्या बोटांनी हळूवार मालिश खूपच संवेदनशील आणि परिणामकारक ठरते, असा माझा हल्ली हल्लीचा अनुभव आहे. त्यामुळे नाक, घसा स्वच्छ आणि मोकळे राहण्यास खूपच मदत होते. सध्याचा करोना व्हायरस प्रामुख्याने नाका-घशाशी संबंधित असल्याचे वाचनात आल्याने, तो एक प्राथमिक प्रतिबंधात्मक साधा, सोपा उपाय ठरू शकेल का?उत्तर : ज्यांचे सतत सर्दीमुळे नाक सतत चोंदते, अशा व्यक्ती तूप किंवा सलाइनचे पाणी नाकात सोडतात. त्यामुळे चोंदलेले नाक नक्की मोकळे होते; पण त्याने करोना विषाणूचा संसर्ग रोखता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाबतच्या भ्रामक समजुतींना उत्तर देणारे एक परिपत्रक काढले होते. त्यात याचा स्पष्ट उल्लेख आहे.प्रश्न : सध्या सांगण्यात येते, की शिजवलेले अन्न खा; तर सलाड, कोशिंबिरी तसेच कच्चा कांदा खावा की नाही?उत्तर : शिजवलेलेच अन्न खावे. भाज्या आणि कांदादेखील शिजवूनच खावा. ५५ अंश सेल्सिअसच्या पुढे करोना आणि इतर सर्व विषाणू नष्ट होतात. आपले अन्न स्वच्छ आणि जंतुविरहित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.प्रश्न : फळे आणि फळभाज्या मीठ किंवा सैंधवाने धुणे पुरेसे आहे का? पालेभाज्या शुद्ध करण्यासाठी काय करावे?उत्तर : फळे आणि फळभाज्या मीठ अथवा सैंधव वापरून धुतल्यास उत्तम. त्याचा वापर जंतुनाशकाप्रमाणे होईल आणि ते रासायनिक नसल्याने, त्यानंतर फळे खायलाही सुरक्षित राहतील. पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि शिजवून खाव्यात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments