सोशल मीडियावर नेपोटिझमवरून नवा वाद सुरू झाला आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांना ट्रोल केलं जातं आहे.
मुंबई, 20 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडलं आहे. सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या नंतर बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर नेपोटिझमवरून नवा वाद सुरू झाला आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांना ट्रोल केलं जातं आहे. यानंतर तीन सेलेब्रिटींनी ट्विटरवरून पळ काढला आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिनेता आयुष शर्मा आणि साकिब सलीम यांनी आपलं ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे. ट्विटरच्या दुनियेला या कलाकारांनी अलविदा म्हटलं आहे. मीडियावर वाढत्या ट्रोलिंगला कंटाळून या कलाकारांनी ट्विटरपासून दूर राहणं पसतं केलं आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या ट्विटरवरील शेवटच्या पोस्टचा स्क्रिनशॉट आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर टाकला आहे. ज्यामध्ये तिनं ‘आग लगे बस्ती मे, मै अपने मस्ती मे. बाय ट्विटर’, असं कॅप्शन दिलं आहे.
तर ट्विटमध्ये तिनं “मानसिक आरोग्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे ते नकारात्मकतेपासून दूर राहणं. ट्विटरवर या दिवसांत असंच काहीसं वातावरण आहे. त्यामुळे मी माझं अकाऊंट डिअॅक्टिवेट करत आहे. बाय, पीस आऊट” असं म्हटलं आहे.
ट्रोलर्समुळे तिने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.
हे वाचा – डिप्रेशनमुळे क्रिकेटरने वडिलांनाही गमावलं; सुशांतप्रमाणेच संपवलं आयुष्य
मागच्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीतल्या काही लोकांवर असा आरोप लावला जात आहे की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या आधारावर फक्त स्टार किड्सनाच संधी दिली जाते आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आउटसायडर्ससोबत हे लोक भेदभाव करतात. असं म्हटलं जातंय की, सुशांत सुद्धा याच नेपोटिझमची शिकार झाला होता. त्यामुळे सध्या हा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे.
संपादन – प्रिया लाड
हे वाचा – सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!
First Published: Jun 20, 2020 10:13 PM IST