Home ताज्या बातम्या सुशांतच्या त्या 4 डायऱ्यांमधून पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्त्वाची माहिती, या गोष्टींचा उलगडा...

सुशांतच्या त्या 4 डायऱ्यांमधून पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्त्वाची माहिती, या गोष्टींचा उलगडा होणार | News


कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या असून त्याची माहिती त्या डायऱ्यांमध्ये सापडली आहे.

मुंबई 27 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant singh Rajput ) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या ज्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या त्यातून बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली आहे. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या असून त्याची माहिती त्या डायऱ्यांमध्ये सापडली आहे.

सुशांची माजी मॅनेजर श्रुती मोदीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना अनेक गोष्टी कळाल्या होत्या. सुशांतने या डायऱ्यांमध्ये त्याची स्वप्न आणि गोल्स याचाही उल्लेख केला होता.

दरम्यान, आता या प्रकरणात अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब मुंबई पोलीस नोंदविणार आहेत. सोमवारी तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या आधी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून सुशांत बद्दल बऱ्याच गोष्टी पोलिसांना कळाल्या आहेत. संजना ही सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेल्या दिल बेचारा मध्ये त्याच्या सोबत होती. आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर 24 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Sushant Singh Rajput Suicide : मन हेलावून टाकणारा शोकसभेचा VIDEO आला समोर

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. सुशांतने जास्तच जवळीक दाखवत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संजनाने केला होता. Me too कँपेन दरम्यान हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

दूर गेलेला सुशांत इथे सापडणार! जिथे बालपण गेलं तिथे स्मारक बनवण्याचा निर्णय

सुशांतला जाऊन आज 13 दिवस झाले तरी या दु:खातून त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार, चाहते सावरले नाही आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांचे, त्याच्या वडिलांचे दु:ख तर अनाकलनिय आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमध्ये सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने एक निर्णय घेतला आहे.

संपादन – अजय कौटिकवार

 

 

First Published: Jun 27, 2020 10:33 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray: Prevent Political Agitation In The Crisis Of The Coronavirus Says Uddhav Thackeray – Uddhav Thackeray: करोना संकटात भाजपची आंदोलनं; CM ठाकरेंनी PM...

मुंबई: करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र, काही राजकीय पक्ष...

Kangana Ranaut: Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश – bombay high court grants interim protection from arrest...

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक...

covid 19 norms in aurangabad: विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३९ लाखांवर दंड वसूल – more than 39 lakh fine recovered from who violate covid 19 norms...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९...

Recent Comments