Home मनोरंजन सुशांतसिंह राजपूत: नवं वळण! सुशांतच्या कंपनीत होता रिया चक्रवर्तीच्या भावाचा हिस्सा -...

सुशांतसिंह राजपूत: नवं वळण! सुशांतच्या कंपनीत होता रिया चक्रवर्तीच्या भावाचा हिस्सा – sushant singh rajput death rhea chakraborty brother partnership in his company police investigating


मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्र्या येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला १३ दिवस झाले. मुंबई पोलीस या प्रकरणी अनेक गोष्टींची कसून चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना त्याच्या घरून चार डायरी मिळाल्या. या डायरीतून सुशांतची कथित प्रेयसी अभिनेत्री रिया चर्कवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या भागीदारीबद्दल कळले.

सुशांतच्या मृत्यूचं गूढ; मृतदेह एका बाजूला झुकलेला होता, पोलीस म्हणाले…

सुशांतसिंह राजपपूतने स्वतः याचा उल्लेख डायरीमध्ये केला आहे. त्याच्या कंपनीमध्ये कोण डायरेक्टर असेल आणि कोणती व्यक्ती काय काम करणार.. टीम कशी असेल याबद्दल तपशीलमध्ये लिहिले होते. पोलिसांनी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीलाही याबाबती प्रश्न विचारले. याशिवाय सुशांतच्या सीएचीही चौकशी केली.

असं असलं तरी या कंपनीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची काय भूमिका असेल आणि त्यांच्या कोणत्या अटी होत्या याबद्दल सांगितले नाही. याचमुळे शोविकचाही पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. या डायरीमध्ये त्याच्या १५० ड्रीम, क्वांटम फिजिक्सचे प्रश्न याशिवाय अनेक प्लॅनिंगचा उल्लेख होता.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन’ (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे.

‘तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments