Home मनोरंजन सुशांतसिंह राजपूत पोस्टमॉर्टम रिपोर्ट: सुशांतचा शेवटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, शरीरावर मिळाल्या नाहीत...

सुशांतसिंह राजपूत पोस्टमॉर्टम रिपोर्ट: सुशांतचा शेवटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, शरीरावर मिळाल्या नाहीत नखांच्या खुणा – sushant singh rajput final postmortem report no nail marks on his body


मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केली असून त्याची हत्या झालेली नाही. सुशांतचा हा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला आहे. अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरून झाला.

विसरा रिपोर्टची वाट पाहत आहेत पोलीस

रिपोर्ट्सनुसार सुशांतसिंह राजपूत चा विसरा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र फॉरेन्सिंग विभागाला ही चाचणी लवकरात लवकर करावी असं सांगितलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापूर्वी सुशांतची हत्या केल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सुशांतसिंह राजपूतवरून पत्रकारावर भडकली दीपिका पदुकोण, मिळालं जशासतसं उत्तर

आतापर्यंत घेतले २३ लोकांचे जबाब

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्र- परिवार, मॅनेजर, टीम मेंबर, घरात काम करणारे कर्मचारी आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसह अनेकांचे जबाब घेतले आहेत. यशराज फिल्म्सकडून सुशांतची कॉन्टॅक्ट कॉपीही घेतली जी २०१२ मध्ये सुशांतने साइन केली होती. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब अजून आलेला नाही. सुशांतच्या सीएचीही चौकशी यावेळी करण्यात आली.


अभिनेता शेखर सुमन यानं ट्विट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेखर सुमन यानं ट्विट केल्यानंतर त्याचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यानं एखादी चिठ्ठी नक्कीच लिहून ठेवली असले, असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘प्रचंड इच्छाशक्ती आणि हुशार असलेल्या सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यापूर्वी त्यानं एखादी चिठ्ठी किंवा पत्र लिहून ठेवलं असतं,इतरांप्रमाणं माझ्या डोक्यातही तेच सुरू आहे. परिस्थिती दिसतेय त्यापेक्षा वेगळीही असू शकते’ असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

इतर क्षेत्रापेक्षा बॉलिवूडमध्ये घराणेशाही जरा जास्तच आहे: कुमार सानू

गळफास घेऊन आत्महत्या

३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर ‘किस देश में है मेरा दिल’, ‘पवित्र रिश्ता’ या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘काय पो छे’ सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘राबता’, ‘पिके’, ‘छिछोरे’ या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chennai Super Kings Full Schedule Fixtures Timing And Team – IPL 2021 Chennai Super Kings Schedule: चेपॉक नव्हे तर हे असेल धोनीचे होम ग्राउंड,...

मुंबई: IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल...

indian idol 12: Himesh Reshammiya Breaks The Silence On Indian Idol 12 Is Going To Be Off Air Soon – कमी TRP मुळे इंडियन...

हायलाइट्स:इंडियन आयडलचा १२ सीझन लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चाशोचा टीआरपी कमी असल्यानं शो बंद होणार असं बोललं जात आहेगायक आणि परीक्षक हिमेश रेशमियानं...

mukesh ambani explosive case: मोठी बातमी! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास NIA करणार; हिरन मृत्यू प्रकरण ATS कडे! – mukesh ambani explosive case home ministry...

हायलाइट्स:मुकेश अंबानींच्या घराजवळील स्फोटक प्रकरण एनआयएकडेकेंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेशमनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडेमहाराष्ट्र गृह विभागाकडून निर्देशमुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ...

Recent Comments