Home मनोरंजन सुशांतसिंह राजपूत वडिलांची प्रतिक्रिया: सुशांतचे वडील म्हणाले, तीन वर्षांच्या प्रार्थनांनंतर जन्मलेला सुशांत...

सुशांतसिंह राजपूत वडिलांची प्रतिक्रिया: सुशांतचे वडील म्हणाले, तीन वर्षांच्या प्रार्थनांनंतर जन्मलेला सुशांत – sushant singh rajput father k k singh reaction after his death


पटणा-सुशांतसिंह राजपूत आता आपल्यात नाही. त्याच्या कुटुंबियांसाठी हे सत्य पचवणं फार कठीण आहे. आयुष्यभराची एक जखम देऊन सुशांत गेला. सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतशी निगडीत काही आठवणी शेअर केल्या.

अनेक प्रार्थनांनंतर झाला होता सुशांतचा जन्म-

एका मुलाखतीत सुशांतचे वडील म्हणाले की, ‘अनेक प्रार्थनांनंतर सुशांतचा जन्म झाला होता. जवळपास तीन वर्ष आम्ही देवाकडे प्रार्थना केली होती. चार मुलींनंतर तो एक मुलगा होता आणि ज्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो त्यांच्यासोबत असंच होतं.’

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचा फोटो करतो हताश

सुशांत तर मनात आणि आत्म्यात आहे

सुशांतच्या आईचं २००२ मध्ये निधन झालं. त्यानंतर केके सिंह हे धार्मिक मार्गावर गेले. याचमुळे त्यांचं सुशांतशी आत्म्याचा संबंध असल्याचं सांगितलं. जेव्हा माणसाला त्याचं एकमेकांशी आत्म्याचं नातं असतं हे समजतं तेव्हा त्याला इतका त्रास होत नाही. सुशांतच्या जाण्यानंतर अनेक लोक त्यांना भेटायला आले जे त्यांच्यापेक्षा जास्त दुःखी होते.

सुरुवातीला सगळं सांगायचा, शेवटी काही सांगितलं नाही

सुशांतने त्याला असणाऱ्या टेन्शनबद्दल काही सांगितलं की नाही यावर बोलताना त्याचे वडील म्हणाले की, ‘सुरुवातीला तो सगळं सांगायचा. पण शेवटी काय झालं ते त्याने सांगितलं नाही. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. जे विध्यात्याने लिहिलेलं असतं तेच होतं. आम्ही त्याला कोणत्याही प्रकारचा ताण द्यायचो नाही आणि कोणी त्याला दुसऱ्यांनी ताण देऊ नये असंही आम्हाला वाटायचं.’

तेलगू सिनेमाने महागडी अभिनेत्री झाली होती कतरिन

दरम्यान, सुशांतच्या शोकसभेला भोजपूरी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार गेले होते. यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही सुशांतच्या वडिलांची भेट घेतली होती. या शोकसभेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यातील सुशांतच्या वडिलांचा हा फोटो मन सुन्न करणारा आहे.

या फोटोत सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह मुलाच्या फोटोच्या समोर बसलेले दिसत आहेत. काळजाचा तुकडा कायम स्वरूपी लांब गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. त्यांच्या डोळ्यातली वेदनाच सर्व काही सांगून जाते. एका वडिलांसाठी मुलाच्या जाण्याचं दुःख कोणीही समजण्याच्या पलिकडे आहे.

‘शशांक केतकरने पाहूनही ओळख दाखवली नाही’

आतापर्यंत घेतले २३ लोकांचे जबाब

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्र- परिवार, मॅनेजर, टीम मेंबर, घरात काम करणारे कर्मचारी आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसह अनेकांचे जबाब घेतले आहेत. यशराज फिल्म्सकडून सुशांतची कॉन्टॅक्ट कॉपीही घेतली जी २०१२ मध्ये सुशांतने साइन केली होती. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब अजून आलेला नाही. सुशांतच्या सीएचीही चौकशी यावेळी करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: खडसे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच; दानवेंची नवी माहिती – eknath khadse originally belongs to ncp, says raosaheb danve

मुंबई: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर चौफेर हल्ले सुरू आहेत. खडसे यांच्या बाबतीत...

mumbai: मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचं डॉक्टरने घेतलं चुंबन – mumbai, doctor arrested, mumbai crime news, मुंबई, विनयभंग, molested

मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन...

aurangabad corona cases: चार रुग्णांचा मृत्यू;, १०२ नवे बाधित – aurangabad reported 102 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील ५८ ते ६५ वर्षांच्या चार बाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या एक हजार ४७ झाली आहे....

Recent Comments