Home मनोरंजन सुशांतसिंह राजपूत: सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युने दुखावला गेला ११ वर्षांचा मुलगा, केली आत्महत्या...

सुशांतसिंह राजपूत: सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युने दुखावला गेला ११ वर्षांचा मुलगा, केली आत्महत्या – sushant singh rajput child committed suicide in uttar pradesh


मुंबई- सुशांतसिंह राजपूतचं जाणं अनेकांसाठीच जिव्हारी लागणारं होतं. सुशांत आता आपल्यात नाही यावर त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. उत्तर प्रदेशमधील एका ११ वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. याआधीही आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत.

सुशांतच्या निधनामुळे दुःखात होता मुलगा

उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील ११ वर्षांच्या मुलाने आईच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले पण त्याआधीच त्याचं निधन झालं. पोलिसांनी कुटुंबाच्या सांगण्यावरून मुलाचं शव त्यांना दिलं. कुटुंबातील व्यक्तीने सांगितल्यानुसार, मुलगा सुशांतचा फार मोठा चाहता होता आणि त्याच्या मृत्यूमुळे दुःखात होता. याचमुळे त्याने आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे.

…म्हणून रियानं सुशांतचं घर सोडलं; पोलिस चौकशीत केला खुलासा

विशाखापट्टणम आणि अंदमानमध्येही झाल्या आत्महत्या

विशाखापट्टणम येथील २१ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. रिपोर्टनुसार, सुशांतच्या निधनाची बातमी कळल्यापासून ती निराश होती. तसेच अंदमानच्या पोर्ट ब्लेअर येथील १५ वर्षीय किशोरीनेही तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. तिने कोणतीही सुसाइड नोट ठेवली नाही. पण पोलिसांना तिच्या काही डायरी मिळाल्या. ज्यात तिने सुशांतसिंहबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या होत्या.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही आत्महत्येच्या घटना

बरेली येथील एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली. मरण्यापूर्वी मुलाने भावाला सांगितले की, जर सुशांतसिंह आत्महत्या करू शकतो तर तोही करू शकतो. याशिवाय पटणामधील १७ वर्षीय किशोरी सुशांतच्या मृत्यूमुळे अस्वस्थ होती. १० वीचे निकाल मनासारखे न आल्यामुळे ती नैराश्यात होती.

काश… तुम्ही दोघांनी लग्न केलं असतं; सुशांत आणि अंकिताच्या मित्राची भावुक पोस्ट

१४ जूनला सुशांतने केली आत्महत्या

सुशांतसिंह राजपूत ने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि यासाठी तो औषधंही घेत होता. आतापर्यंत पोलिसांनी १६ लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments