Home ताज्या बातम्या सुशांत आत्महत्या प्रकरण : Me Too ते डिप्रेशन... संजनाने केले अनेक नवे...

सुशांत आत्महत्या प्रकरण : Me Too ते डिप्रेशन… संजनाने केले अनेक नवे खुलासे sushant singh rajput suicide case sanjana sanghi statement on sushant behavior on set of dil bechara | News


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘दिल बेचारा’मधील अभिनेत्री संजना सांघी हिची तब्बल 9 तास चौकशी केली.

मुंबई, 1 जुलै : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (30 जून )त्याचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’मधील अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी केली. ही चौकशी तब्बल 9 तास चालली. या चौकशीत संजनाला सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांतवर लावण्यात आलेल्या मी टू आरोपांबद्दल आणि त्याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांत डिप्रेशनमध्ये जाण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले.

अभिनेत्री संजाना सांघीनं दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये या सिनेमासाठी तिची ऑडिशनच्या माध्यमातून निवड झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केलं आहे. त्यांनंतर तिला समजलं की ती सुशांत सिंह राजपूतसोबत काम करणार आहे आणि सिनेमाच्या सेटवर तिची आणि सुशांतची पहिल्यांदा भेट झाली होती.

संजनानं पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार तिने सुशांतवर कोणत्याही प्रकारचे मीटू संबंधी आरोप लावले नव्हते किंवा तिच्यासोबत प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नव्हती. संजना म्हणाली, ‘2018 मध्ये जेव्हा मी टू चळवळ सुरू होती त्यावेळी कोणीतरी अफवा पसरवली होती की सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान सुशांतनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यानं मी त्याच्यावर आरोप केले आहेत. पण मी त्यावेळी भारतात नव्हते. मी माझ्या आईसोबत व्हेकेशनसाठी यु.एसला गेले होते. मला याबाबत कोणतीच माहिती नव्हती.’

View this post on Instagram

Whoever said time helps heal all wounds, was lying. Some feel like they’re being ripped open, again and again, and bleeding – Of moments that now will forever remain memories, Of laughs together that were but will never again be, Of questions that will remain unanswered, Of disbelief, that only keeps growing But these wounds also contain a film, a gift that everyone is yet to see, Wounds that contain dreams, plans, and desires for our country’s children, their education and their future that will be fulfilled, Wounds that contain a passion for an endless creative zest for every artist there is, Wounds that contain the hope for a world that promises to uphold honesty, integrity, kindness and embraces individuality – rid of all toxicity, I vow that I will do everything to make sure each of these dreams are fulfilled, like you always wanted me to. Except, you’d promised we’d do it all together. . . . #SushantSinghRajput #ThinkingOfYou

A post shared by Sanjana Sanghi (@sanjanasanghi96) on

संजनानं पुढे सांगितलं, ‘सिनेमाचं पहिलं शेड्युल पूर्ण झालं होतं आणि दुसऱ्या शेड्युल पर्यंत माझ्याकडे बराच वेळ होता तर मी आईसोबत फिरायला गेले. मला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की, सोशल मीडिया आणि टीव्हीवर ब्लाइंड स्पॉटच्या माध्यमातून माझ्या नावाने सुशांतवर असे आरोप केले जात आहेत. मी जेव्हा भारतात आले तेव्हा मला याबाबत समजलं. त्यावेळी मी सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं की हे सर्व खोट्या अफवा आहेत आणि माझ्यासोबत असं काहीही घडलेलं नाही. मी सुशांत आणि मुकेश सरांना भेटले. या घटनेमुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की त्याला बदनाम करण्यासाठी हा कोणीतरी कट रचला आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.’

संजनाने सांगितलं, ‘सुशांतनं त्यावेळी आमच्या दोघांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि माझी त्याने त्याबाबत माफी सुद्धा मागितली होती. मी त्यावेळी यु.एस. ला असल्यानं त्याचा माझा काहीच संपर्क होत नव्हता आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडे स्वतःवरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने आमच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि मला त्याबाबत कोणतीही समस्या नव्हती कारण त्याच्यावर झालेले आरोप हे खोटे होते. त्या केवळ अफवा होत्या आणि सुशांतकडे असं करण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.’

संजना सांघीच्या म्हणण्यानुसार, सुशांत संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान नॉर्मल होता. तो एक शांत डोक्याचा माणूस होता. त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल तो कोणासोबतच बोलला नव्हता. जेव्हा कुटुंबाबाबत काही बोलणं होत असे त्यावेळी तो पटणा येथील त्याच्या कुटुंबीयांचे विनोदी किस्से आमच्या सर्वांसोबत शेअर करत असे. माझं आणि सुशांतचं बोलणं केवळ सिनेमापुरतं होत असे. ज्यात तो अनेकदा मला चांगले सल्ले देत असे आणि मोटीव्हेट करत असे.

First Published: Jul 1, 2020 09:59 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aus vs ind 4th test: AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी भागिदारी – aus vs ind...

ब्रिस्बेन:aus vs ind 4th test day 3 highlights भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात...

marati movies 2021: मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार नवी केमेस्ट्री; ‘या’ जोड्या पहिल्यादाच दिसणार एकत्र – upcoming fresh pairs in marathi cinema you’ll get to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले. पुढे मार्चच्या मध्यानंतर लॉकडाउनच्या दिवसात एकही सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. ओटीटीवर देखील...

डोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह!

म. टा. वृत्तसेवा कल्याण : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि ''च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज...

Recent Comments