Home ताज्या बातम्या सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची लव्हस्टोरी; UNSEEN VIDEO रिलीज sushant sing...

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची लव्हस्टोरी; UNSEEN VIDEO रिलीज sushant sing rajput and ankita lokhande lovestory unseen viral video mhpl | News


सुशांत आणि अंकिता यांच्या पडद्यावरील लव्हस्टोरीचा व्हिडीओ आता रिलीज करण्यात आला आहे.

मुंबई, 01 जुलै : ‘आसमान में जब तक सितारे रहेंगे…’ अजूनही हे गाणं प्रत्येक जण गुणगुणतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant sing rajput) आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) यांच्या पवित्र रिश्ता (pavitra rishta) या मालिकेतील हे गाणं. हे गाणं ऐकलं की सुशांत आणि अंकिता यांच्या प्रेमाची आठवण होतेच. रिल लाइफच नाही तर रिअल लाइफमध्येही या कपल्सवर चाहत्यांनी खूप प्रेम केलं. त्यांची ही जोडी सर्वांनाच आवडू लागली. आता या दोघांचाही असा व्हिडीओ समोर आला आहे, जो कुणी कधीच पाहिला नाही.

सुशांत आणि अंकिताच्या ‘जैसी हो वैसी रहो’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे.पवित्र रिश्तादरम्यान त्यांचं हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. मात्र याआधी ते रिलीज होऊ शकलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांसाठी आता हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे आणि सर्वांना हे गाणं खूप आवडलं आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.

हे वाचा – सिनेमांपेक्षा कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत राहिली रिया चक्रवर्ती, वाचा काय आहे कारण

मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की – ‘लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे’

हे वाचा – ‘… तर मी आत्महत्या करेन’, अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ

त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताला मोठा धक्का बसला आहे. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अंकिता आता सोशल मीडियापासून दूर झाली आहे. मात्र या दोघांचेही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jul 1, 2020 10:24 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments