Home मनोरंजन सैयामी खेर: ..म्हणून दोन आठवडे रोज बँकेत जायचे! - saiyami kher interview...

सैयामी खेर: ..म्हणून दोन आठवडे रोज बँकेत जायचे! – saiyami kher interview on her web series netflix choked


मुंबई- ‘चोक्ड: पैसा बोलता है’ या चित्रपटात सैयामी खेरनं साकारलेल्या महाराष्ट्रीय महिलेच्या भूमिकेचं कौतुक होतंय. या भूमिकेच्या तयारीसाठी तिनं कशी तयारी केली? चित्रीकरणाचा एकूण अनुभव याविषयी तिनं ‘मुंटा’शी गप्पा मारल्या आहेत.

० ‘चोक्ड: पैसा बोलता है’ हा चित्रपट का करावासा वाटला?

– मला २०१७ साली या चित्रपटासाठी विचारण्यात आलं. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी नाशिकला राहायचे. तिथंही असंच वातावरण होतं. चित्रपटातील काही प्रसंग माझ्या वैयक्तिक आयुष्याशी मी जोडू शकले.

० अनुराग कश्यप यांच्यासह काम करण्याचा अनुभव कसा होता?

– अनुराग सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती होती. इतक्या मोठ्या दिग्दर्शकाकडून भूमिकेसाठी विचारणा होणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट आहे. खूप काही शिकवणारा अनुभव होता हा. ते दिलेला शब्द पाळतात, ही कौतुकास्पद बाब आहे. कारण बॉलिवूडमध्ये दिलेला शब्द पाळणारे फार कमी आहेत.


० चित्रपटातील व्यक्तिरेखेशी जुळवून घेण्यासाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागली?

– दहा वर्षांच्या मुलाची आई वाटावी म्हणून मी दहा-बारा किलो वजन वाढवलं. तसंच एका बँकेत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कामाचं निरीक्षण केलं. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन आठवडे मी दररोज बँकेत जाऊन बसायचे आणि तेथील महिला कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत बघायचे. तसंच स्क्रिप्ट उत्तम प्रकारे लिहिली गेल्यानं ते सगळं आमच्या अभिनयात उतरत गेलं. सहकलाकारांचीही उत्तम साथ लाभली.

० कमी वयात आईची भूमिका करण्याचा निर्णय घेण्यामागे कारणं काय होती?

– ‘मिर्झियां’ चित्रपटानंतर अनेक भूमिकांसाठी विचारणा झाली, पण त्यात नवीन असं काहीच नव्हतं. ‘चोक्ड…’मधील आईची भूमिका करण्याआधी खूप विचार केला. अनुराग सरांनीही सांगितलं की, भूमिका स्वीकारण्याआधी विचार कर. कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये एखादी भूमिका केल्यानंतर विशिष्ट साच्यात बसवलं जातं. म्हणजे एखाद्या प्रकारची भूमिका केली की, त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारलं जातं. पण, ही भूमिका वेगळ्या धाटणीची असल्यामुळे ती स्वीकारली.


० चित्रीकरणाचा अनुभव कसे होते?

लोकांच्या गराड्यात राहून काम करणं आव्हानात्मक असतं. पण, लोकांना कळणार नाही अशा प्रकारे चित्रीकरण केलं. कॉलेजच्या दिवसात सीएसएमटी स्टेशनला उतरायचे. तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्यासोबत उपेंद्र लिमयेसुद्धा होते. एकदा स्टेशनवर चित्रीकरण करताना लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. पण, थोड्या वेळानं पुन्हा चित्रीकरण सुरळीत सुरू झाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

गौहर खान: अभिनेत्री गौहर खानच्या वडिलांचं निधन, इस्पितळात घेतला अखेरचा श्वास – actress gauahar khan father passed away

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान वर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी गौहरच्या वडिलांचं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते....

FYJC admissions: अकरावी प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाइनच: वर्षा गायकवाड – fyjc admissions is online, future mode will be decided, says education minister in vidhimandal

हायलाइट्स:करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाइनपुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया कशी, याबाबत लवकरच होईल निर्णयशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीम. टा. प्रतिनिधी,...

Recent Comments