Home ताज्या बातम्या सोनिया गांधींच्या विश्वासू सल्लागाराची EDने केली 8 तास चौकशी, म्हणाले, ते तर...

सोनिया गांधींच्या विश्वासू सल्लागाराची EDने केली 8 तास चौकशी, म्हणाले, ते तर मोदींचे पाहुणे, ahmed-patel-after-ed-questioning-govt-fighting-opposition-instead-of-china-and-covid-19 mhak | National


‘सरकार जेव्हा कुठल्या संकटात असते तेव्हा ते असंच काहीतरी प्रकरण बाहेर काढतात त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाते.’

नवी दिल्ली 27 जून: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे (Sonia gandhi) विश्वासू अहमद पटेल (Ahmed-patel) यांची ED ने आज तब्बल 8 तास चौकशी केली. EDचं एक पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यांनी संदेसरा ग्रुप प्रकरणातल्या आर्थिक बाबींसंदर्भात ही चौकशी केली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देतांना अहमद पटेल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

EDचं पथक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पाहुणे होते. ते आले, त्यांनी प्रश्न विचारले आणि मी त्यांना उत्तरे दिली आणि ते गेले असं त्यांनी सांगितलं.

सरकार जेव्हा कुठल्या संकटात असते तेव्हा ते असंच काहीतरी प्रकरण बाहेर काढतात त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाते. जेव्हा केहा निवडणुका असतात किंवा देशात एखादा प्रश्न महत्त्वाचा असतो तेव्हा अशाच प्रकारे या तपासण यंत्रणा सक्रिय होतात असा आरोपही त्यांनी केला.

देशात कोरोनाचं संकट मोठं आहे. चीन सीमेवर वाद सुरू आहे असं असतानाही सरकार ते प्रश्न सोडून विरोधकांशी लढत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. आमच्याकडे लपवविण्यासारखं काहीच नसून आमचा आवाद दाबवण्यासाठी सरकार हा खेळ खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

First Published: Jun 27, 2020 11:39 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments