Home आपलं जग हेल्थ स्क्रीनटाइमला द्या ब्रेक

स्क्रीनटाइमला द्या ब्रेकमुंबई टाइम्स टीम

लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम या नव्या कार्यपद्धतीचा अनेक ठिकाणी अवलंब करण्यात आला. शिवाय घराबाहेर पडणं शक्य नसल्यामुळे, विरंगुळ्यासाठी वेब सीरिजचा पर्याय, मित्रांसोबतच्या गप्पांसाठी व्हिडीओ कॉल्स, ऑफिसच्या मीटिंगसाठी व्हिडीओ कॉन्फरन्स, या गोष्टी रोजच्या सवयीच्या झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच दिवसातील बराचसा वेळ हा लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रीनसमोर जातोय. अनेक अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार लॅपटॉप आणि मोबाइलच्या सततच्या वापरामुळे मानसिक ताणसुद्धा वाढतोय. म्हणूनच स्क्रीनपासून डोळ्यांना आणि मनाला सुट्टी देणं गरजेचं आहे. यासाठी पुढील काही गोष्टी करुन बघता येतील…

० नोटीफिकेशन करा बंद

फोनवर नोटीफिकेशनचा आवाज आला की, तिकडे लक्ष जातंच! यावरील उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडियाची नोटीफिकेशन बंद करून ठेवणं. महत्त्वाच्या कामासाठी किंवा गरजेची असतील त्या अॅप्सचीच नोटीफिकेशन्स सुरु असतील तर मोबाइलकडे सतत लक्ष जाणार नाही. केवळ विरंगुळ्यासाठी किंवा टाइमपास म्हणून वापरत असलेल्या सोशल मीडिया ॲपची नोटीफिकेशन बंद करा आणि निश्चिंत व्हा.

० वापराचं वेळापत्रक हवं

एखादा दिवस सोशल मीडियाचा वापर न करणं हे अनेकांसाठी अशक्य आहे, हे खरं! पण, या सोशल मीडियाचा वापर किती वेळासाठी आणि कधी करायचा, याचं एक वेळापत्रक असायला हवं. त्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत ॲप किंवा मोबाइल वापरण्याचं कटाक्षानं टाळा. हा वेळ दिवसातून अर्ध्या तासाहून अधिक असणार नाही याची काळजी घ्या.

० फायदेशीर दुरावा

मोबाइल आजूबाजूला असेल तर सतत तो हातात घेण्याची इच्छा होते. त्यामुळे गरज नसताना मोबाइल जवळ ठेवू नका. त्यामुळे सतत मोबाइल वापरण्याची इच्छा होणार नाही आणि स्क्रीनवरून लक्ष थोडं दुसरीकडे जाण्यास मदत होईल.

० टीव्हीसुद्धा जरा बेतानं

संध्याकाळचा मोकळा वेळ आणि टीव्ही, हे समीकरण अनेक घरात पाहायला मिळतं. पण, टीव्हीच्या स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या किरणांचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संध्यकाळी टीव्ही बघत असाल तरी फार उशिरापर्यंत टीव्हीसमोर बसून राहायचं नाही, हे लक्षात असू द्या.

० झोपण्याआधी मोबाइल ऑफ

सतत मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे, शांत झोपेची गरज अधिक वाढली आहे. रात्री झोपायला जाण्याआधी मोबाइल सुरु असेल तर वेळेवर झोपणं शक्य होणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वीच मोबाइल स्वीच ऑफ करा. ते करणं शक्य नसल्यास झोपण्याच्या खोलीत मोबाइल नसेल याची काळजी घ्या.

० मुलांसाठी हवी मधली सुट्टी

ऑनलाइन शाळा आणि क्लास, हेदेखील आता नित्याचंच झालं आहे. मुलांना घराबाहेर पडता येत नसल्यानं विरंगुळ्यासाठी टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल अशा उपकरणांना जवळ करण्यात आलं आहे. अशा वेळी, त्यांच्या डोळ्यांनासुद्धा विश्रांती मिळणं आवश्यक आहे. शाळा आणि क्लासच्या लेक्चरमधून मुलांना सुट्टी मिळत नसली, तरी मुलं सतत मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर करणार नाहीत याची काळजी घ्या.

० शिकू या आनंदे

सतत मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करत राहण्यापेक्षा नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणं अधिक फायद्याचं ठरेल. नवा पदार्थ शिकणं, एखादं वाद्य किंवा नवी कला शिकून घेणं ही गोष्ट तुमच्या फायद्याची आहे. दिवसातील काही काळ व्यायामासाठी राखून ठेवण्याचा पर्यायसुद्धा निवडता येईल. मनाला विश्रांती मिळण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरेल. नव्या गोष्टी शिकण्याचा आनंद तासाभराच्या एखाद दोन एपिसोडहून अधिक असेल.

संकलन- ईशान घमंडेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

BSF Jawan in Honey Trap: बीएसएफ जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले! – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक...

Recent Comments