Home ताज्या बातम्या हमीद अली ऐवजी हनीफ अलीला मिळाला डिस्चार्ज; रुग्णालयाच्या एका चुकीने किती लोकांवर...

हमीद अली ऐवजी हनीफ अलीला मिळाला डिस्चार्ज; रुग्णालयाच्या एका चुकीने किती लोकांवर कोरोनाची टांगती तलवार mistaken identity assam hospital covid19 positive got discharged mistakenly agaisnt cured | Coronavirus-latest-news


ही एक बातमी निश्चित झोप उडवणारी आहे. रुग्णालयाची छोटीशी चूक सध्याच्या COVID च्या काळात किती धोकादायक ठरू शकते याचं हे उदाहरण.

गुवाहाटी, 11 जून : Coronavirus च्या साथीच्या काळात दररोज नवनवे आकडे समोर येत आहेत. रुग्णालयात बेड न मिळणं, वाढत्या गर्दीमुळे आलेला ताण, रुग्णालयात मिळणाऱ्या असुविधा याविषयी बातम्या तर येतच आहेत. पण या सगळ्यात आलेली एक बातमी निश्चित झोप उडवणारी आहे. रुग्णालयाची छोटीशी चूक सध्याच्या COVID च्या काळात किती धोकादायक ठरू शकते याचं हे उदाहरण.

आसाममधल्या गुवाहाटीत मंगलडोई सिव्हिल हॉस्पिटलची बातमी म्हणूनच देशभर पसरली आहे. या रुग्णालयातून Coronavirus वर मात करून सोडलेल्या रुग्णांबरोबर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णदेखील सोडण्यात आला. नावातल्या साधर्म्यामुळे ही चूक घडली. पण त्यामुळे 13 बऱ्या झालेल्या रुग्णांबरोबर हा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सोडण्यात आला. एकाच अँब्युलन्समधून 5 जणांना घरी सोडण्यात आलं. त्यामध्ये हा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होता. हा रुग्ण घरी जाताच घरच्यांबरोबरही मिसळला. अख्खा दिवस तो घरात वावरत होता. आता या एका चुकीमुळे पुन्हा एकदा त्या रुग्णाचं घर आणि परिसर पुढच्या 15 दिवसांसाठी सील करावं लागलं आहे. कुटुंबीयांचा धोका वाढला आहे. याशिवाय त्या 5 बऱ्या झालेल्या रुग्णांनाही पुन्हा एकदा क्वारंटाइन केलं गेलं आहे.

राज्यात धोकादायक वाढ, आज सापडले सगळ्यात जास्त 3607 रुग्ण; संख्या लाखाच्या जवळ

हमीद अली आणि हनीफ अली या नावांमधल्या साधर्म्यामुळे गोंधळ झाला, असं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. या दोघांमधला हमीद अली कोरोनातून बरा झाला होता. हनीफ अलीचा रिपोर्ट पॉझिटिव्हच होता. पण याचाच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समजून त्याला घरी सोडण्यात आलं. गोपिनाथ बोरा या रुग्णालय अधीक्षकांनी चूक मान्य करून पुन्हा एकदा घरी सोडलेल्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं आहे.

हे रुग्णालय अशा प्रकारच्या निष्काळजीच्या प्रकरणांसाठीच जास्त प्रसिद्ध आहे. यापूर्वीसुद्धा अशा केसेस घडल्या आहेत. 2018 मध्ये नवजात बालकांची चुकून अदलाबदली केली होती. त्यात तर दोन वेगवेगळ्या धर्मीयांच्या बालकांचा समावेश असल्याने प्रकरण कोर्टात गेलं होतं. 2013 मध्ये या रुग्णालयात ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यानंतर 4 लोकांना HIV एड्सची लागण झाली होती.

अन्य बातम्या

रात्री झोप लागत नाही? झोपण्याच्या तासाभरापूर्वी फक्त ही एक गोष्ट करा

COVID-19: भारताने ब्रिटनला टाकलं मागे, मुंबई, दिल्ली सर्वात धोकादायक!

 

First Published: Jun 11, 2020 10:05 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Digital India: मोबाइल नेटवर्क नसल्याने गाव विक्रीला – khultabad bhadaji village resident decided to sale village due to lack of mobile network

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद२१व्या शतकात भारत डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करीत असताना तालुक्यातील भडजी गावात कोणत्याही मोबाइल कंपनीचे नेटवर्क नाही. करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणापासून...

career news News : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा’ – 10th 12th class students online education series dnyanganga on jio channel

म. टा. प्रतिनिधी, पुणेशालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा...

galaxy f series: Samsung Galaxy F सीरीजचा नवा फोन Galaxy F12 येतोय – samsung working on next galaxy f series phone galaxy f12 in...

नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात ऑनलाइन एक्सक्लूसिव Galaxy M Series आणली होती. या सीरीजच्या डिव्हाइसेज शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करता...

Recent Comments