Home ताज्या बातम्या हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? थोरातांचे राऊतांना जशास तसे उत्तर |...

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? थोरातांचे राऊतांना जशास तसे उत्तर | Mumbai


केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?

मुंबई, 17 जानेवारी : ‘मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

औरंगाबाद नामकरणाच्या मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आता बाळासाहेब थोरात यांनी पत्र सणसणीत टोला लगावला आहे.

‘औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल थोरात यांनी राऊत यांनी विचारला आहे.

‘गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे’ अशी जळजळीत टीका थोरात यांनी केली.

‘राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे’ अशी खरमरीत टीका थोरात यांनी शिवसेना आणि भाजपवर केली.

‘राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू’ असंही थोरात यांनी ठणकावून सांगितले.

‘महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही’ असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला.


Published by:
sachin Salve


First published:
January 17, 2021, 2:46 PM IST

Tags:







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Poco C3: ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी, पोकोच्या या फोनला खरेदी करा फक्त ६२९९ रुपयात – poco c3 buy just at rs 6200...

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत...

Rekha Jare Murder Case: ८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला ‘हा’ संशय – rekha jare murder case: runal jare...

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही?...

Yogi Adityanath: Akhilesh Yadav : ‘मुख्यमंत्री सदनात जी भाषा वापरतात, ती एखाद्या योगीची भाषा नाही’ – the language the chief minister speaks in the...

हायलाइट्स:'लहानपणी मुख्यमंत्र्यांनी लाला मिरची खाल्ली होती वाटतं...''लाल हा आमच्या भावनांचा रंग... आमची सुख - दु:ख या रंगाशी जोडलेलं'अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

Recent Comments