Home मनोरंजन हिंदी मालिका: आता प्रत्येकाला वेळेवर मिळणार कामाचा मोबदला आणि विमा संरक्षण -...

हिंदी मालिका: आता प्रत्येकाला वेळेवर मिळणार कामाचा मोबदला आणि विमा संरक्षण – now in hindi serial everyone get compensation on time and insurance


हिंदी मालिकांच्या सेटवर आता ‘लाइट्स…कॅमेरा…अॅक्शन’ असा आवाज घुमणार आहे. चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला करोना विमा संरक्षण देण्यात येणार असून, कलाकारांना कामाचा मोबदला दर महिना दिला जाणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिने बंद असलेलं मालिकांचं चित्रीकरण आता नव्या नियमांसह, नव्या जोमानं सुरू होणार आहे. विमा न मिळण्याच्या मुद्द्यावरुन सुमारे ९ हिंदी मालिकांचं चित्रीकरण थांबवून ठेवण्यात आलं होतं. पण, चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या सर्वांना विमा देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. ‘मुंटा’नं याबाबतीत ‘शूटिंग सुरू, विम्याचं काय’ आणि ‘शूटिंग आधीच ब्रेक’ अशा बातम्या प्रसिद्ध करत कलाकार आणि सिनेकर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. आता मागण्या मान्य झाल्यामुळे चित्रीकरण सुरू करण्याचे सर्व मार्ग खुले झाले आहेत. कामाचा मोबदलाही तीन महिन्यांनंतर न मिळता; दर महिन्याला देण्याचं निर्माता संघटनेनं मजूर केलं आहे.


गेले तीन महिने पूर्णपणे बंद असलेली सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्री गेल्या काही दिवसांत रुळावर यायचा प्रयत्न करतेय. काम सुरू करताना कलाकार आणि चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावं अशी कर्मचारी संघटनांची मागणी होती. तसंच कामाचा मोबदला तीन महिन्यांनी न मिळता दर महिन्याला मिळावा अशीही मागणी संघटनांनी निर्मात्यांकडे केली होती.

परिणामी २३, २४ जूनला हिंदीमधल्या तब्बल नऊ टीव्ही मालकांचं चित्रीकरण मुंबईत सुरू होताच थांबलं होतं. ज्यात ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘तुझसे है राब्ता’, ‘कुरबान हुआ’ सारख्या मालिकांचा समावेश होता. सिंटा अर्थात ‘सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिएशन आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’नं विम्याच्या मुद्द्यावरुन आक्षेप घेत चित्रीकरणात सहकार्य करण्यास नकार दिला. कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना करोना संबंधी विमा संरक्षण दिलं जावं, अशी मागणी त्यांनी केली होती. ‘इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिल’नं ही मागणी मंजूर करत सेटवरील कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.


उपचारांसाठी २ लाख

यापूर्वी केवळ सेटवर काही अपघात झाल्यास विमा संरक्षण दिलं जात होतं. आता आजारपणासाठी देखील विमा संरक्षण दिलं जाणार आहे. करोनाची लागण झालेल्या व्यक्तीस उपचारांसाठी दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे. तर करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याचे २५ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती निर्माते-अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिली. सिंटा, फेडरेशन आणि निर्मत्यांची बुधवारी ऑनलाइन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

मोबदला दर महिना

बहुतांश टीव्ही कलाकारांना त्यांच्या मोबदल्याची रक्कम तीन महिन्यांनी मिळत होती. परंतु, आता ही रक्कम कलाकारांना दर महिन्याला मिळणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कलाकारांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

Recent Comments