Home देश हिलाल अहमद डार: पीचएचडी करणाऱ्या हिलालनं धरला 'हिजबुल मुजाहिद्दीन'चा हात - jammu...

हिलाल अहमद डार: पीचएचडी करणाऱ्या हिलालनं धरला ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा हात – jammu missing : phd scholar hilal ahmad dar from srinagar has joined hizbul mujahideen


श्रीनगर : जवळपास आठवड्याभरापूर्वी पर्वतारोहण मोहिमे दरम्यान गांदरबल जिल्ह्यात बेपत्ता झालेला श्रीनगरचा एक तरुण दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचं समोर येतंय. जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिलीय. हिलाल अहमद डार असं या तरुणाचं नाव आहे.

पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरं देताना ‘होय, हिलाल अहमद डार हा तरुण दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात सापडलाय’ असं म्हणत काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.

हिलाल आपल्या मित्रांसोबत गांदरबल जिल्ह्यातील नरनागमध्ये पर्वतारोहणासाठी १३ जून रोजी निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

दरम्यान, २१ जून रोजी जूनीमार क्षेत्रात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. त्यात हिलाल डारचाही समावेश असल्याचं म्हटलं जातंय.

हिलालचे कुटुंबीय

वाचा :पुलवाम्यात २ दहशतवादी ठार; एक जवान शहीद, ४ महिन्यात १०० दहशतवाद्यांना कंठस्नानवाचा :काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पोलिसांनी दिली माहिती
कोण आहे हिलाल अहमद डार?

हिलाल हा काश्मीर विद्यापीठाचा पीएचडीचा विद्यार्थी आहे. हिलाल दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचं सांगतानाच पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी आम्ही अजूनही हिलालला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, यासाठी हिलालचे कुटुंबीय आणि मित्र महत्त्वाची भूमिका निभावू शकतील, असं म्हटलंय.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हिलाल हा आपल्या चार मित्रांसोबत १३ जून रोजी घरातून गंगल गांदरबलला ट्रेकिंगसाठी म्हणून घरातून बाहेर पडला होता. परंतु, त्यानंतर मात्र तो परत घरी आला नाही. त्याचे मित्र मात्र त्याच दिवशी सायंकाळी घरी परतले होते.

बेपत्ता हिलालसाठी कुटुंबीयांनी दोन-तीन वेळा काश्मीर प्रेस एनक्लेव्हच्या बाहेर आंदोलन करत जम्मू-काश्मीर पोलिसांना आणि प्रशासनाकडे हिलालच्या शोध लावण्याची विनंती केली होती. आपला मुलगा कोणत्याही दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याच्या बातम्यांवर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी कठीण आहे.

गेल्या महिन्यात सुरक्षा यंत्रणेच्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या हिजबुल कमांडर जुनैद सहराई याचा हिलाल हा मित्र असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. बेपत्ता हिलालचा तपास करताना ही गोष्ट समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

वाचा :Ladakh Standoff: चीनी सैनिकांना धडा शिकवणाऱ्या शूर सैनिकांना लष्कर प्रमुख भेटले
वाचा :भारतीय जवानांच्या बुलेट प्रुफ जॅकेटचं ‘चीन’ कनेक्शन!, नीती आयोगाचा विरोध
वाचा :बगजान तेल विहीर आग : भारतीय लष्करानं २४ तासांत उभारला पूलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments