Home शहरं नागपूर होतोय गुणाकार; जपा!

होतोय गुणाकार; जपा!मनपा आयुक्तांनी व्यक्त केली भीती; नियम पाळण्याचे आवाहन

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

काही दिवसांपूर्वी मोमिनपुरा, सतरंजीपुरा आणि आता नाईक तलाव-बांगलादेश हा शहरातील करोनाबाधितांचा नवा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने आता महापालिका प्रशासनच हादरले आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात करोना संसर्गाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही केले आहे.

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य शासनाच्या दिशानिर्देशांनुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे नव्हे. चारचाकी वाहनात ‘वन प्लस टू’ आणि दुचाकीवर केवळ एका व्यक्तीने प्रवास करणे असा नियम असताना याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सुरक्षित वावरचे पालन न करणे, आवश्यकता नसतानाही घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे, अशी नाराजीही आयुक्तांनी व्यक्त केली.

नागरिकांतर्फे कोव्हिड-१९च्या गाइडलाइनचे पालन न करणे, खबरदारी न घेणे, बेजबाबदारपणाचे वर्तन करणे यामुळे कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या शिथिलतेसह कोव्हिड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासनाच्या दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाहीतर नागपुरात कोव्हिड-१९ चा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त करतानाच नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

फौजदारी कारवाईस बाध्य करू नका!

‘हे शहर आपले आहे. या शहराला सुरक्षित ठेवायचे असेल तर नागरिकांनी नियम पाळायलाच हवेत. नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये. हे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे. खबरदारी घ्या, प्रशासनाला साथ द्या, जबाबदारी दोघेही घेऊ आणि करोनाची साखळी खंडित करू. असे केले नाही तर नागपुरात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण वाढतील. मृत्युसंख्याही वाढेल. सर्वांनी एकत्रित नियमांचे पालन केले तर ही स्थिती टाळता येईल’, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पुन्हा नव्या ५८ बाधितांची भर

करोना प्रादुर्भावाच्या विक्रमी पॉझिटिव्ह धक्क्यातून सावरतही नाही तोच उपराजधानीसाठी गुरुवारचा दिवसही चिंता वाढविणारा ठरला. गुरुवारी दुपारपर्यंत या प्रादुर्भावात पुन्हा ५८जणांची भर पडली. त्यामुळे बाधितांच्या आकड्याने नवी उसंडी मारत ९२१चा पल्ला गाठला आहे. मेडिकलमध्ये रात्री ९ च्या सुमारास ५३वर्षीय सारीग्रस्त महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

प्रादुर्भाव झालेल्या ९२० जणांपैकी आतापर्यंत शहरात १५जण दगावले. तर ५४१ जण उपचार घेऊन घरी परतले. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मेडिकल, मेयो आणि एम्स अशा ३ ठिकाणी ३६४ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. करोनाची नव्याने लागण झालेल्यांमध्ये सुरुवातीला सकाळी २० नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. यात १३जण लष्करीबागेतील, तीनजण मोमिनपुरा येथील तर चारजण नाईक तलावाला लागून असलेल्या बांगलादेश येथील आहेत. तर मेयोच्या चाचणीत तीनजण पॉझिटिव्ह आले. यापैकी दोनजण मोमिनपुऱ्यातील तर एकजण बांगलादेश वस्तीतील आहे. यानंतर दुपारच्या सत्रात नीरीच्या प्रयोगशाळेत २९जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले बहुतांश नमुने हे यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्यांच्या सहवासात आल्याने पाचपावलीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्यांपैकी आहेत. नीरीच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नाईक तलाव परिसरातील सातजण, चार हंसापुरीतील आणि तीनजण वाडीतील रहिवासी आहेत. याखेरीज पाचजण गीतांजली थिएटरजवळील भगवाघर येथील रहिवासी आहेत.

याखेरीज आरपीटीएसच्या दहा जवानांना शांतीनगरातील विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांच्याही घशातील स्राव नमुन्यांमध्येही करोनाचा अंश सापडला. सायंकाळी एम्सच्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोराडीतील एक तर दुसरा नाईक तलावाजावळील बांगलादेश येथील आहे. मेयोच्या लॅबमध्ये रेल्वे कॉलनितील एकजण पॉझिटिव्ह आला. खासगी प्रयोगशाळेतूनही आज एकाचा दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांचा आकडा आता ९२० वर गेला आहे.

दिवसभरात १२ जणांना डिस्चार्ज

घडामोडीत करोनाची लागण झाल्यानंतर उपचाराने त्यावर मात केलेल्या सहाजणांना मेयोतून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. यात टिमकी येथील २७वर्षीय तरुण, २५, ५२वर्षीय महिला, भानखेडा येथील ३०वर्षीय महिला मोमिनपुरा येथील ४५वर्षीय महिला प्रेमनगरातील ५०वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एम्समधूनही सहाजणांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्याही आता ५४१ झाली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments