Home देश 12 bsf jawans test positive in tripura: त्रिपुरा: १२ बीएसएफ जवानांना करोना;...

12 bsf jawans test positive in tripura: त्रिपुरा: १२ बीएसएफ जवानांना करोना; संपूर्ण बटालियन क्वारंटीन – 12 bsf jawans test positive in tripura whole battalion has been quarantined


आगरतळा (त्रिपुरा): दिल्लीत सीआरपीएफच्या एकूण १२२ जवानांना करोना झाल्याचे वृत्त आल्यानंतर, आता त्रिपुरातही सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एकूण १२ जवांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएसएफने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफमध्ये एकूण ५४ जणांना करोनाची लागण झाली आहे. यात त्रिपुरातील १४ जवानांचा समावेश आहे. या चौदापैकी २ जवानांच्या चाचण्या शनिवारी पॉझिटीव्ह आल्या होत्या.

या १२ जवानांना ढलाई जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर शनिवारी पॉझिटीव्ह आलेल्या २ जवानांना आगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जवान उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीएसएफच्या १२ जवानांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक बीएसफ जवानांना आरोग्य विभागाने क्वारंटीन केले आहे. १२ जवानांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण बटालियन क्वारंटीन करण्यात आली आहे. शिवाय या जवानांच्या संपर्कात इतर कोण आले आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

दारूच्या दुकानांसमोर सकाळपासूनच रांगा, लोकांमध्ये दिसली अधीरता

या सर्व जवानांना करोनाची लागण कशी झाली याबाबत मात्र अजून समजू शकलेले नाही.

तथापि, बटालियनमधील एका ४९ वर्षीय जवानाला प्रथम करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा जवान गंडाचेरा तेथील आयसोलेटेड समीमेवर तैनात होता. या सीमेवर बांगलादेशातून लोकांची ये-जा चालू असते अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. हा पहिला करोनाग्रस्त जवान बांगलादेशातून आलेल्या एखाद्या करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाउन ३.०: पाहा, देशात आज पासून काय सुरू, काय बंद?
दरम्यान, लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांनी म्हटले आहे. सरकारने घालून दिलेले नियम लोकांनी पाळावे. सरकार तुमच्या सुरक्षेसाठी जागरुक आहे. सरकारचे प्रयत्न सुरू असून कोणतीही परिस्थिती हाताळण्यात सरकार सक्षम आहे, असेही देब म्हणाले.

करोना Live: देशात २४ तासांमध्ये करोनाचे २,५५३ नवे रुग्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments