Home विदेश 1300 years old temple in Pakistan: पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा; १३०० वर्ष...

1300 years old temple in Pakistan: पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा; १३०० वर्ष जुने मंदिर आढळले – 1300 year old hindu temple found in pakistan


इस्लामाबाद: पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम भागातील स्वात जिल्ह्यात १३०० वर्ष जुने हिंदू मंदिर आढळून आले आहे. स्वात मधील डोंगराळ भागात पाकिस्तानी आणि इतालवी पुरात्व विभागाच्या तज्ज्ञांनी हे मंदिर शोधले आहे. बारिकोट घुंडई भागात सुरू असलेल्या उत्खन्नात हे मंदिर सापडले आहे. त्याच्या जवळच एक जल कुंडही आढळले आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पुरात्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची गुरुवारी माहिती दिली. हे मंदिर विष्णू देवाचे असल्याचे सांगण्यात आले. या मंदिराची निर्मिती १३०० वर्षांपूर्वी हिंदू शाही काळाच्या दरम्यान करण्यात आली होती.

हिंदू शाही अथवा काबूल शाही (इ.स. ८५० ते १०२६) दरम्यानचे राजघराणे आहे. या हिंदू राजवंशाने काबूल खोरे (पूर्व अफगाणिस्तान), गंधार ( सध्याचा पाकिस्तान) आणि सध्याच्या भारताच्या उत्तर-पश्चिम भागात राज्य केले होते. पुरात्व विभागाने केलेल्या उत्खन्नात मंदिराजवळ छावणी आणि टेहळणी करण्यासाठी उंच मनोरे आढळून आले आहे.

उत्खन्ना दरम्यान मंदिराजवळ पाण्याचे कुंडही आढळले आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविका या ठिकाणी स्नान करत असावे. पुरात्व अधिकारी खलिक यांनी सांगितले की, या भागात पहिल्यांदाच हिंदू शाही काळातील अवशेष सापडले आहेत. इटलीच्या पुरात्व मिशनचे प्रमुख डॉ. लुका यांनी सांगितले की, स्वात जिल्ह्यात गंधार संस्कृती काळातील हे पहिले मंदिर आहे. स्वात जिल्ह्यातील काही ठिकाणी बौद्ध धर्माशी निगडीत विहार व इतर अवशेषही आढळून आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments