Home ताज्या बातम्या 2 श्रमिक ट्रेन रद्द झाल्याने मजुरांचा आक्रोश; पोलिसांवर दगडफेक, केली गाड्यांची तोडफोड...

2 श्रमिक ट्रेन रद्द झाल्याने मजुरांचा आक्रोश; पोलिसांवर दगडफेक, केली गाड्यांची तोडफोड | National


विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना त्याच्या गावी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे

अहमदाबाद, 17 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असल्याने लॉकडाऊनची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. यादरम्यान विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या श्रमिक ट्रेनच्या मदतीने मजुरांना आपल्या गावी जाता येत आहे.

गुजरातमधील राजकोटमध्ये रविवारी प्रवासी मजुरांनी दगडफेक केल्याची बाब समोर आली आहे. राजकोटमधील शापर औद्योगिक भागातून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणारी दोन श्रमिक ट्रेन रद्द झाली. यानंतर चिडलेल्या मजुरांनी वाहनांची तोडफोन केली. राजकोट ग्रामीणचे एसपी बलराम मीणा यावर म्हणाले की, या घटनेत जे लोक सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

यापूर्वी शनिवारी गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील एका कोविड – 19 प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि काही वाहनांची तोडफोड केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री तब्बल 68 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीहल्ला केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भक्तिनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की लोकांना पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक कली आणि वाहनांची तोडफोड केली. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रेड झोनमधील बॅरिकेट्स हटविण्यास रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मजुरांनी गोंधळ घातला आणि वाहनांची तोडफोड केली.

संबंधित –गरीब विक्रेत्याकडून खरेदी केले सर्व चपलांचे जोड; अनवाणी चालणाऱ्या मजुरांना दिले

मुंबईवरून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, परभणीतील रुग्णांची संख्या वाढली

 

First Published: May 17, 2020 05:18 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments